Aditi Sunil Tatkare sakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojana: ज्यांनी बोगसगिरी करुन लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले, त्यांच्या खात्यावर शासकीय व्यवहार होणार नाहीत; मंत्री तटकरेंची माहिती

Aditi Tatkare: राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने ३८ अर्ज भरलेत. त्याने ⁠वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले. त्यामुळे ⁠संबंधित बँकांना याबाबत कळवून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिलेत आहेत.

संतोष कानडे

मुंबईः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रीयांऐवजी पुरुषांनीच एक किंवा एकापेक्षा जास्त अर्ज केल्याचा प्रकार पुढे आला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य शासन कठोर पावलं उचलत असून अशा लोकांच्या बँक खात्यावर कारवाई होणार आहे. एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे ३८ अर्ज भरुन पैसे उचलल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला होता.

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने ३८ अर्ज भरलेत. त्याने ⁠वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले. त्यामुळे ⁠संबंधित बँकांना याबाबत कळवून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिलेत आहेत.

तटकरे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते सील केले जाणार आहेत. ⁠त्या खात्यांशी कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाहीत. ⁠१५-२० दिवसांमध्ये व्हेरीफिकेशन केले जाईल. ⁠२५ तारखेपासून जे पैसे मिळतायेत त्या महिलांनी पहिल्या दोन महिन्यात अर्ज केले होते त्यांना दिले जात आहेत.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

लाडकी बहीण योजनेसाठी ⁠दोन कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्या अर्जांची छाननी केली जात आहे. चौकशीत ज्या नागरिकांनी दुसरेच आधारकार्ड वापरुन लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

⁠ते ३८ बँक खाते महिलांचे नाहीयेत असं प्राथमिक चौकशीत समोर आलेलं आहे. ⁠ज्या महिलांची नावे वापरण्यात आली आहेत, त्यांच्यादेखील खात्यांची चौकशी केली जाणार आहे. सध्या लाभार्थी महिलांना ⁠तिसरा हफ्ता वितरित होत आहे.

गडकरींबद्दल तटकरे म्हणाल्या...

  • गडकरी साहेब महाराष्ट्राकरता आदरणीय व्यक्ती आहेत

  • ⁠त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते

  • ⁠ते काय बोलले हे मला माहिती नाहीये

  • ⁠पण नागपूरमधील कार्यक्रमात त्यांनी या योजनेचे कौतुक केलं होतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT