goat 
महाराष्ट्र बातम्या

शासनाची भन्नाट योजना! शेतमजूर अन्‌ शेतकऱ्यांना अवघ्या २५ टक्के रकमेत ४ शेळ्या अन्‌ १ बोकड; २४ जानेवारीपर्यंत करा अर्ज, कागदपत्रे कोणती लागतात? वाचा...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी व शेतमजुरांना ७५ टक्के अनुदानावर चार शेळ्या व एक बोकड मिळणार आहे. त्यासाठी ५ ते २४ जानेवारीपर्यंत पात्र लाभार्थींना अर्ज करावा लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी व शेतमजुरांना ७५ टक्के अनुदानावर चार शेळ्या व एक बोकड मिळणार आहे. त्यासाठी ५ ते २४ जानेवारीपर्यंत पात्र लाभार्थींना अर्ज करावा लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर चार शेळ्या व एक बोकड आणि ५० टक्के अनुदानावर मिल्किंग मशिन देणाऱ्या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अर्ज मागविले आहेत. पंचायत समिती स्तरावर त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर ते अर्ज जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला पाठविले जातील. त्याठिकाणी छाननी होऊन निवड समितीमार्फत लाभार्थींची निवड होईल.

अर्जाचा नमुना सोलापूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातील उपायुक्त डॉ. व्ही. डी. येवले यांनी केले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी, हा योजनेमागील हेतू आहे. लाभार्थीस केवळ २५ टक्के रक्कम भरल्यावर चार शेळ्या व एक बोकड मिळणार आहे. त्या अर्जातील संपूर्ण माहिती वस्तुनिष्ठ भरावी लागणार आहे. तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे, कारण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी व शेतमजुरीसाठी ही योजना आहे.

योजनेच्या अर्जासाठी लागतात ‘ही’ कागदपत्रे

फोटो ओळखपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, सातबारा, आठ-अ, ग्रामपंचायत नमुना नं-आठ, प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास), जात प्रमाणपत्र, बचत सदस्य प्रमाणपत्र (असल्यास), रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नावनोंदणी कार्ड (असल्यास), अपत्य दाखला (ग्रामपंचायतीचा किंवा स्वयंघोषणापत्र), शौचालय प्रमाणपत्र किंवा स्वंयघोषणापत्र, रेशनकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची मिश्र सुरुवात! युद्ध समाप्तीच्या संकेतांनी बाजाराला दिलासा; मात्र या सेक्टरवर दबाव वाढला

India Bangladesh Diesel Supply : युद्धामुळे जगावर इंधनाचे संकट, तरीही भारताने बांगलादेशला पाठवले ५००० टन डिझेल; नेमकं कारण काय ?

Latest Marathi News Live Update : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांची कुपर रुग्णालयाला भेट

Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

SCROLL FOR NEXT