Mantralay News sakal
महाराष्ट्र बातम्या

सरकारची मोठी योजना! तालुक्यात किंवा शहरात राहणाऱ्या 'या' विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी ४३,००० रुपये मिळतील, योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत? वाचा...

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे स्वाधार योजना सुरू आहे. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचा शिक्षणातील खंड दोन वर्षांपेक्षा कमी असावा आणि वयाची अट ३० वर्षांपर्यंत आहे. गावागावातील विद्यार्थी तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी इयत्ता अकरावीपासून शिकायला जातात, त्यावेळी त्यांना स्वाधार योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण ४८ हजार रुपये मिळणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे स्वाधार योजना सुरू आहे. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचा शिक्षणातील खंड दोन वर्षांपेक्षा कमी असावा आणि वयाची अट ३० वर्षांपर्यंत आहे. गावागावातील विद्यार्थी तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी इयत्ता अकरावीपासून शिकायला जातात, त्यावेळी त्यांना स्वाधार योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण ४८ हजार रुपये मिळणार आहेत. त्यात त्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय व्हावी हा योजनेचा हेतू आहे.

आता जुलैअखेर अकरावीचे प्रवेश होतील. त्यावेळी शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणानिमित्ताने महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सोलापूर जिल्ह्यात १६ वसतिगृहे आहेत. त्याठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने वसतीतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू केली आहे. त्यात सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांना जेवण व राहण्यासाठी ४३ हजार रुपये मिळणार आहेत.

याशिवाय व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जादा पाच हजार रुपये आणि बिगरव्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना शालेय साहित्यासाठी दोन हजार रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत. तर तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३८ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ ३० वर्षांपर्यंत पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी दिला जाणार आहे.

नव्याने लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रे

दहावीनंतर इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृह मिळाले नाही, त्यांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचे बोनाफाईड आणि महाविद्यालयांमधील उपस्थिती पत्र, अशी कागदपत्रे http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे. याशिवाय योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी वसतिगृहाशिवाय ज्या ठिकाणी राहायला आहे, तेथील भाडेकरार देखील लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून महत्त्वाची योजना

ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी अर्ज करूनही लाभ मिळालेला नाही, त्यांनी तत्काळ बॅंक खात्याचे डिटेल्स व स्वत:ची महाविद्यालयातील उपस्थिती (७५ टक्के पेक्षा जास्त) हे कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तर नव्याने योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीनंतर पदव्युत्तर पदवीपर्यंत योजनेचा लाभ घेता येईल. स्वाधार योजनेतून मिळणाऱ्या रकमेतून विद्यार्थ्यांची तालुका व शहरात राहण्याची व जेवणाची सोय होणार आहे.

- सुलोचना महाडीक, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT