Governor Bhagat Singh Koshyari sakal
महाराष्ट्र बातम्या

कर्नाटकबद्दलच्या उल्लेखामुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं?

गेल्या काही दिवसांत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. याचेच पडसाद आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच मोठा गोंधळ झाला. यावेळी राज्यपालांनी भाषणाची सुरुवात वाचल्यानंतर थेट शेवट करत सभागृहातून काढता पाय घेतला. राज्याच्या इतिहासात आतापर्यंत पहिल्यांदाच राज्यपालांकडून अशा प्रकारचं कृत्य झाल्यानं त्यांच्यावर टीका केली जातेय. दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणाची लिखित प्रत पटलावर मांडण्यात आली असून त्यावर पुढच्या दोन दिवसात चर्चा होणार आहे. कर्नाटकातील घटनेच्या निषेधाचा उल्लेख भाषणात असल्यानं राज्यपालांनी भाषण करणं टाळल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यपालांनी त्यांच्या भाषणात बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा विटंबना याचा तीव्र निषेध करण्यात आला होता. तसेच बेळगाव मधील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाने दडपशाही केलेलं कृत्य याचा उल्लेख निंदनीय असा होता. याची चर्चा आता होत आहे. राज्यपालांनी भाषणाच्या सुरुवातीला २०२२ या वर्षातील पहिल्या अधिवेशनात सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर ते म्हणाले की,''माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे सतत अनुसरण करीत आहे.'' राज्यपाल हे अभिभाषण करतानाच सभागृहात मोठा गोंधळ झाला.

राज्यपाल सभागृहातून निघून गेले तरी त्यांचे भाषण पटलावर मांडण्यात आले. त्यांच्या भाषणात बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे. भाषणात म्हटलं आहे की, माझ्या शासनाचा, महाराष्ट्राच्या सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्धार आहे. 16 डिसेंबर, 2021 रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगाव मधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करीत आहे. विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाने केलेली दडपशाहीची कृत्ये निंदनीय असल्याचा उल्लेख भाषणात आहे.

सध्या कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार सत्तेत आहे. अशा परिस्थितीत सरकार विरोधात आणि कर्नाटकमधील घटनेचा निषेध याबाबत भाषणात उल्लेख असल्यानं राज्यपालांनी भाषण वाचणं टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपालांनी राष्ट्रगीताचा अपमान करणं योग्य नाही अशा शब्दात टीका केली. तर राज्यपालांनी असं निघून जाणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे, तसंच हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT