Raj Thackeray Bhagatsingh Koshyari Sakal
महाराष्ट्र बातम्या

"मराठी माणसाला डिवचू नका"; कोश्यारींची होशियारी म्हणत राज ठाकरे संतापले!

तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे सध्या राज्यात मोठा गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याविषयीचा संताप व्यक्त केला आहे. हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान असल्याची भावना राज्याच्या राजकारणातून व्यक्त होत आहे. याबद्दल आता राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरेंनी ट्वीट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे म्हणतात, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

राज ठाकरे पुढे म्हणतात की, महाराष्ट्रात मराठी माणसानं इथलं मन आणि जमीन मशागत करुन ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक इथं व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT