Govinda Reservation Uday Samant s explanation regarding MPSC student eknath shinde mumbai  Sakal
महाराष्ट्र बातम्या

गोविंदा आरक्षण : MPSC बाबत उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

सवलतीमुळे स्पर्धा परीक्षा (एमपीएससी) विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहींहडीनिमित्त गोविंदांना सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण देण्याच्या घोषणेवरून विरोधकांनी सरकारला घेरले असतानाच सत्ताधाऱ्यांनीही बाजू मांडत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. या सवलतीमुळे स्पर्धा परीक्षा (एमपीएससी) विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज स्पष्ट केले. गाविंदांना आरक्षण देताना इतर क्रीडा प्रकारांवरही परिणाम होणार नसून, भविष्यात साहसी खेळ म्हणून दहीहंडीचा समावेश करण्याचा प्रयत्न असेल, असेही सामंत यांनी सांगितले. अशा प्रकारच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र नियमावली राहणार असून, त्याचा अन्य घटकांना फटका बसणार नसल्याचा शब्दही सामंत यांनी दिला.

गोविंदांना क्रीडा कोट्यातून पाच टक्के आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यावरून वादाला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामंत, आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला. सामंत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची निर्णय घेतला आहे. मात्र, गोविदांचे थर लावणारे अशिक्षित असतात, असे काहीजण सांगत आहेत. मग, त्यांना नोकरी कसे देणार असेही लोकांचे म्हणणे आहे. परंतु खेळाडूंना अशिक्षित म्हणणे योग्य आहे का? गोविदांना आरक्षण देताना वयोगट, शिक्षण याचे निकष ठरवले जातील. तालुका, जिल्हा पातळीवर स्पर्धा घेऊन त्यातून कौशल्याला प्राधान्य राहील. या निर्णयामुळे आधीच्या खेळांची मान्यता रद्द होणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे ५ टक्के आरक्षण मिळेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT