महाराष्ट्र बातम्या

राज्यात पुन्हा लॉकडाउन? अजित पवार यांनी दिली मोठी माहिती

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 25 ते 30 हजारांच्या घरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना आटोक्यात आणण्यासाठी काही शहरांमध्ये पुन्हा एकादा कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहाता राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जारी करण्यात येणार, असल्याच्या चर्चेला उधाण येत आहे. सोशल मीडियासह अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लागणार का? अशी चर्चा केली जात आहे.  लॉकडाउन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन लावण्याचा राज्य सरकार सध्या कोणताही विचार करत नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला अजित पवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर विशेष मुलाखत दिली आहे. या प्रकट मुलाखतीत त्यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला.

राज्यातील काही शहरांमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहून निर्बंध लावले आहेत. त्यामुळे तुर्तास राज्यातील लॉकडाउनबाबत सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्य कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबात चिंता व्यक्त करत, परस्तिती न बदलल्यास राज्यात लॉकडाउन लावू असा इशाराही दिला आहे, असे पवार म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, कोरोना महामारीचा वाढत प्रादुर्भाव पाहून स्थानिक प्रशासन अथवा आधिकार्यांना  कठोर उपाययोजना राबवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळेच राज्यातील काही शहरांमध्ये लॉकाडउन लावण्यात आलेला आहे. तर काही शहरात रात्रीची संचारबंद लागू करण्याचा निर्णय तेथील जिल्हाधिकाऱ्यानं घेतल आहे. तसेच, राज्यातील महत्वाच्या शहरांत शनिवार व रविवार कडक लॉकडाउन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्याशिवाय, ठरावीक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यास तिथे निर्बंध लावण्यात आले आहेत. मुंबईत पुर्ण क्षमतेनं सुरु असलेल्या लोकलमुळेही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की,  पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष देऊन आहोत. त्यासाठी वारंवार स्थानिक आधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून पुण्यात गेल्या आठवड्यात काही निर्बंध लावले आहेत. तसेच या आठवड्यातही पुण्याच्या परिस्थितीवर बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्याकडून दरदिवशी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जातो. येथील वरिष्ठ आरोग्य आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाकडून कंटेनमेंट झोनमध्ये कठोर अंमलबजावणी केली जात आहे. 

दरम्यान,  महाराष्ट्राची वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी असल्याचं मत नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी व्यक्त केलं होतं. राजेश टोपे यांनी सोमवारी पुण्याला भेट दिली होती. यावेळी ते म्हणाले की पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत असून ही चिंतेची बाब आहे. राज्यातील कोरोनाच्या चाचण्या वाढल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे.  इतर राज्यातील कोरोनाची आकडेवारी अचूक असेल याबाबत शंका आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बुधवारी महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना महामारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशात दहा शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ शहरांचा समावेश आहे. तर कर्नाटकमधील एका शहराचा समावेश आहे.  पुणे,  नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोला या नऊ शहरांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT