toll plaza sakal media
महाराष्ट्र बातम्या

वाहनधारकांना दिलासा: 'फास्टॅग' जाणार 'जीपीएस' येणार

वाहनधारकांना दिलासा; टोलनाक्यावरील रांगा होणार कमी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: टोल नाकावरील रांगा आणि गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 'फास्टॅग' (Fasttag) प्रणाली सुरु केली होती. मात्र आता 'फास्टॅग' एेवजी 'जीपीएस'(GPS) प्रणाली तंत्राचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. संसदीय समितीने 'फास्टॅग' हटवण्याची शिफारस केली आहे. परिवहन आणि पर्यटन संसदेच्या समिती अध्यक्षांनी बुधवारी संसदेमध्ये एक रिपोर्ट सादर केला. यानुसार आता 'जीपीएस' प्रणाली लवकरच सुरु होणार आहे.

जीपीएस यंत्रणेच्या मदतीने टोलचे (Toll Plaza )पैसे बँक खात्यातून वजा करणारी यंत्रणा उभी राहणार आहे. ऑनलाईन रिचार्ज करताना काहीजणांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र जीपीएस यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर या समस्येतून कायमची वाहनधारकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. याशिवाय टोल नाका उभा करण्याचा खर्चही कमी होणार आहे.

टोलनाक्यावरील ‘फास्टॅग’मुळे राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) पर्याय शहरी व ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ घटली आहे. ‘फास्टॅग’ने त्या अवजड वाहनांना लगाम लागल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरी वस्तीला दिलासा मिळाला आहे. रस्त्यांचा दर्जाही चांगला राहण्यास हातभार लागला आहे.

या प्रस्तावातील प्रमुख मुद्दे

१) जीपीएस प्रणाली अंतर्गत पैसे थेट बँकेतून वजा केले जाणार

२) टोल नाक्यावरील रांगा कमी होतील

३) टोल नाका उभा करण्यासाठी येणारा खर्च कमी होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Jobs : महसूल सेवकांच्या २,९९२ पदांची भरती; ३० नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश

Pune Railway: पुणे रेल्वेच्या प्रश्नांवर १३ खासदार आक्रमक; प्रवासी सुरक्षा आणि सुविधांवर अधिकाऱ्यांना जाब

Teacher Recruitment Update : सरकारी शाळांमध्ये 15,000 शिक्षकांची महाभरती; एकाच अर्जावरून अनेक पदांसाठी कसा कराल अर्ज? ऑनलाईन अर्जाची मुदत सात सप्टेंबरपर्यंत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चेन्नईमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची घेतली भेट

Supreme Court: धनुष्यबाणावर ठाकरे गटाचा मोठा दावा! ‘चिन्ह आम्हाला द्या, नाहीतर गोठवा’; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल आक्रमक

SCROLL FOR NEXT