Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात रात्रीपर्यंत जीआर निघणार; राज्य सरकारकडून हालचालींना वेग

संतोष कानडे

मुंबईः जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली असून मराठा आरक्षणाच्या संदर्भातने आज एक जीआर निघण्याची शक्यता आहे.

'टीव्ही ९'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मराठा आरक्षणासाठी समिती स्थापन करण्यासंदर्भातला जीआर थोड्यात वेळात निघणार आहे. आज रात्रीपर्यंत हा जीआर निघू शकतो. राज्य शासन समितीमध्ये कोणाचा समावेश करणार आणि समिती आरक्षणाच्या संदर्भाने कोणती कामं करणार, हे स्पष्ट होईल.

तिकडे जालन्याच्या अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. परवापासून त्यांनी पाणीही वर्ज्य केलंय. वरचेवर त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. काल गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये गेलं होतं.

गिरीश महाजन यांच्या शिष्टमंडळाने एक महिन्यााच वेळ आंदोलकांकडे मागितला. परंतु जरांगे पाटलांनी चार दिवसाचा वेळ देऊन निर्णय घेण्याची मागणी केली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीतही मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

त्यानुसार थोड्याच वेळात मराठा आरक्षणासाठी समिती स्थापन करण्यासंदर्भात जीआर निघू शकतो. सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलेले आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी आग्रही आहे. त्याचीच पडताळणी करण्यासाठी शासन आदेश निघू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT