graduate and teacher constituency election, election result 2020, Jayant Patil, devendra fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

MLC Election Results 2020: जयंत पाटलांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

सकाळ ऑनलाईन टीम

Graduate And Teacher Constituency Election Result 2020 पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीनं बाजी मारली. राज्यातील दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठित बनलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेकांना सत्तेची स्वप्ने पडतात. ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात साध्य होणार नाही, असेच चित्र निकालांवरुन दिसते,असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांनी आता महा विकास आघाडीच्या विरोधात पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान जयंत पाटील यांनी यावेळी केले. पुण्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत भाजपला सपशेल अपयश आले. महा विकास आघाडीने निवडणुकीत बाजी मारुन एकीचे बळ दाखवून दिले. या निकालानंतर महा विकास आघाडीचे ताकद आणखी वाढल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीसाठी सर्वांनी मेहनत घेतील. तीन पक्ष एकत्र लढल्याने त्यांची ताकदीचा अंदाज घ्यायला कुठे तरी चुक झाली, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. ही पहिलीच निवडणूक होती. पुढच्या वेळी योग्य नियोजन करुन बाजी मारु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT