Satyajeet Tambe esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe: निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना धक्का; ट्विट करत दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. दरम्यान, निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे.

माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. अशा आशयाचे ट्विट तांबे यांनी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.

मानस पगार कोण आहेत?

मानस पगार हे काँग्रेस पक्षाचे नाशिकचे युवक जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये येण्याच्या आधीपासून पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांसाठी त्यांनी काम सुरु केले होते. युथ फॉर डेमोक्रसी या संघटनेच्या माध्यमातून सेक्यूलर विचारांना अधिक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते.

भाजपाकडून करणाऱ्या येणाऱ्या आरोपांना, दाव्यांना पुराव्यासहीत खोडून टाकण्याचे प्रसंगी प्रतिवाद करण्याची भूमिका मानस घेत असत. त्यांच्या लिखाणामुळे अनेक तरुण काँग्रेससोबत जोडले गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT