Anil Parab  esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Parab : ''शिवसेनेने नोंदवलेली नावं बाद तर भाजपने नोंदवलेली नावं कायम'', अनिल परबांचा आक्षेप

आमच्या पक्षाची नावं ठरवून बाद केली जात आहेत, असा आरोप अनिल परब यांनी निवडणूक आयोगावर केला. शिवसेनेने नोंदवलेली नाव सर्व बाद केली आहेत आणि भाजपने नोंदवलेली नावं कायम आहेत, असंही परब म्हणाले.

संतोष कानडे

मुंबईः पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या नोंदणीवरुन ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) नोंदवलेली नावं मतदार याद्यांमधून बाद झाली आहेत तर भाजपने नोंदवलेली नावं कायम आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल परब म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल आम्ही वर्षभर बोलत आहोत.निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी ती कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का? असा प्रश्न पडतोय. निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टाने देखील ताशेरे ओढले आहेत.

परब पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या आदेशावरून काम करत असल्याचं आम्हांला दिसलं आहे. पदवीधर निवडणुकीत आयोग म्हणतं की, जास्त नोंदणी करा.. आम्ही नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही हजारो नावं नोंदवली होती, तेव्हा ते चेक केल जातं आणि मग आम्हांला स्लिप दिली जाते. अर्ज जेव्हा नाकारले जातात तेव्हा ते तिकडेच परत दिले जातात. काही तरी कारणं असतील तर सांगितली जातात लगेच.

आमच्या पक्षाची नावं ठरवून बाद केली जात आहेत, असा आरोप अनिल परब यांनी निवडणूक आयोगावर केला. शिवसेनेने नोंदवलेली नाव सर्व बाद केली आहेत आणि भाजपने नोंदवलेली नावं कायम आहेत, असंही परब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा लालबाग परिसरातून पुन्हा लालबाग गेटजवळ आला

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Mumbai Water Level: वर्षभराची चिंता मिटली! गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील धरणे फुल्ल; आकडेवारी आली समोर

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका! 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT