Nana Patole 
महाराष्ट्र बातम्या

Graduates Constituency Election : सत्यजीत यांची अपक्ष उमेदवारी; नाना पटोले म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

Mahrashtra Politics : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस बाकी राहिला आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचे ठरलं होतं. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेऊन ए.बी. फॉर्म अभावी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे. (Graduates Constituency Election news in Marathi)

नाना पटोले यांना सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत विचारलं असता ते म्हणाले की घडलेली प्रकार चांगली नाही. मात्र याबाबत काय घडलं याची माहिती घेऊन मी भूमिका स्पष्ट करणार आहे. सुधीर तांबे यांनी का माघार घेतली ही माहिती घ्यावी लागणार आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.

सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून तांबे कुटुंबाने एकप्रकारे काँग्रेसचा आदेश डावलला आहे. तर सत्यजीत तांबे खुद्द सहकार्यासाठी भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं म्हणत आहे. अर्थातच भाजपला देखील सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवार असल्यामुळे पाठिंबा देणं जड जाणार नाही. मात्र या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष बॅकफूट गेली का असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT