Nilesh Rane  esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane: शिंदे गट-भाजपातले मतभेद चव्हाट्यावर; नेत्याने नितेश राणेंना सुनावलं!

नितेश राणे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

रुपेश नामदास

Sanjay Shirsat: भाजपा आमदार नितेश राणे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मतदारांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे. कणकवली नांदगाव इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही.

राणे पुढे म्हणाले, "निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणताही मंत्री माझ्याशिवाय पुढे विकासकामं करूच शकणार नाही. माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा ही निधी देणार नाही." या विधानावरुन आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

हेही वाचा-इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

दरम्यान शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "दमदाट्या करून ग्रामपंचायत जिंकता येत नसतात, त्यासाठी लोकांना आपलंसं करावं लागतं, या प्रतिक्रिये नंतर भाजप आणि शिंदे सरकारच्या आमदारांचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

ग्रामपंचायतीत निवडणुकीत स्थानिक पातळीचं राजकारण असतं. गावातील लोकांना जिंकून आणि त्यांना आपलंसं करून निवडणूक लढवली तर नक्कीच विजय होतो. तिथं धमकी किंवा दादागिरी करणं बरोबर नसून केलेलं विधान चुकीचं आहे असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT