Dhananjay Munde Pankaja Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Gram Panchayat Election Result : जिल्ह्यात BJPची सरशी झाल्याचा पंकजांचा दावा; पण परळीत...

सकाळ डिजिटल टीम

बीड - राज्याभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. विविध पक्षांकडून या निवडणुकीत विजयाचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण आहे. भाजपच्या नेत्या आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील बीड जिल्ह्यात भाजपचीच सरशी झाल्याचा दावा केला आहे. मात्र त्यांच्या परळी विधानसभा मतदार संघात त्यांची पिछेहाट झाल्याच दिसून येत आहे. (Gram Panchayat Election Result news in Marathi)

पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात भाजपची सरशी झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी पेडे देखील वाटले आहेत. त्या संदर्भात त्यांनी ट्विट करून म्हटलं की, 'ग्रामपंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी...अभिनंदन आमच्या कार्यकर्त्यांचे'. मात्र परळी विधानसभा मतदार संघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसून येत आहे.

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजय उत्सवाची तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी स्टेज करण्यात आले आहे. तसेच डॉल्बी आणि ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत.

मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत किंवा आघाडीवर असल्याचे प्राथमिक फेरीत दिसून येत आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, संबंध बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलची आघाडी आहे. पंकजा यांनी ट्विट करून भाजपच्या सरशीच्या दाव्यावर ते म्हणाले की, पंकजा यांचं ट्विट किती वेळ टिकेल हे कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : कपिल देव पाकिस्तानवर भडकले! म्हणाले, एका पिढीची तुम्ही वाट लावताय, तुमच्याच खेळाडूंचं नुकसान करताय...

मोठी बातमी! राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ कागच भिरकावणारे सहा खासदार निलंबित, अध्यक्षांची कारवाई

Pankaja Munde: ''मला कालच कळलं होतं...'', पंकजा मुंडेंनी सांगितली हेलिकॉप्टरबद्दलची माहिती

'द अजित पवार' मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणालेले-

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुती इतिहास घडवणार- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT