rupee-is-up-by-15-paise (1).jpeg sakal
महाराष्ट्र बातम्या

ग्रामपंचायतींना यंदा मिळणार विकासकामांसाठी १६० कोटी! सोलापूर जिल्हा परिषदेने दिली शासनाला माहिती; ‘या’ महिन्यात मिळणार निधी; जनगणना न झाल्याचा गावांना फटका

सोलापूर जिल्ह्यातील एक हजार २४ ग्रामपंचायतींना यावर्षी १५ व्या वित्त आयोगातून विकासकामांसाठी साधारणपणे १६० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यासंदर्भातील माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने त्रुटींची पूर्तता करून शासनाला पाठविली आहे. ज्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक हजार २४ ग्रामपंचायतींना यावर्षी १५ व्या वित्त आयोगातून विकासकामांसाठी साधारणपणे १६० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यासंदर्भातील माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने त्रुटींची पूर्तता करून शासनाला पाठविली आहे. ज्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे, त्याठिकाणी निधी खूपच कमी मिळेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागच्या वर्षी पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीतील किती निधी सध्या शिल्लक आहे, त्या ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या, गावची लोकसंख्या, वार्षिक पुस्तिका, लेखापरीक्षण, वार्षिक विकास आराखडा अशा बाबींची माहिती शासनाने नुकतीच मागवून घेतली आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ९३ कोटी ५८ लाखांचा बंदीत तर ६२ कोटी ३९ लाखांचा अबंदीत निधी मिळाला होता. यंदा त्यात काही कोटींची वाढ होऊन १६० कोटींपर्यंत निधी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘आमचा गाव आमचा विकास’ या ब्रिदवाक्यानुसार गावांच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी असतो. सध्या सोलापूर जिल्ह्यातील ५३ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. या ग्रामपंचायतींना निधी कमी मिळू शकतो, तो निधी अन्य ग्रामपंचायतींकडे वळविला जातो.

वित्त आयोगाकडून मिळणारा निधी दोन टप्प्यात येतो. पहिल्या टप्प्यातील निधी ऑगस्ट तर दुसऱ्या टप्प्यातील निधी साधारणत: फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळतो. गतवर्षीचा निधी शिल्लक राहिला तर तो ग्रामपंचायतींना पुढील वर्षी वापरता येतो. मात्र, ज्या कामांसाठी हा निधी दिला आहे त्यासाठीच तो खर्च करण्याचे बंधन ग्रामपंचायतींवर घातले जाते. गावांना पिण्यायोग्य स्वच्छ, पुरेसे पाणी मिळावे, गावकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे हा निधी देण्यामागील मुख्य हेतू आहे.

जनगणना न झाल्याचा गावांना फटका

सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या सध्या ३८ लाखांवर पोचली आहे, पण २०११ च्या जनगणनेनुसारच शासनाकडून वित्त आयोगाचा निधी वितरित केला जातो. कारण, २०११ नंतर जनगणना झालेली नाही. वित्त आयोगाचा निधी हा लोकसंख्येच्या प्रमाणात गावांच्या विकासासाठी दिला जातो. त्यात बंदीत (पाणी व स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन असा निधी) आणि अबंदीत (अन्य गरजेची विकासकामे) निधी असतो. आता जनगणना झाल्यानंतर ग्रामपंचायतींना वित्त आयोगातून मिळणारा निधी देखील वाढणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणारा निधी

  • एकूण ग्रामपंचायती

  • १,०२४

  • ‘प्रशासकराज’च्या ग्रामपंचायती

  • ५३

  • वित्त आयोगाचा अपेक्षित निधी

  • १५९.८० कोटी

  • निधीचे एकूण टप्पे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

Raigad Protest: पालीत जंतरमंतर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन; विद्यार्थी समर्थनार्थ नागरिकांची मोठी एकजूट

Latest Marathi Update : पेपरफुटीप्रकरणी दोषींना लवकर शिक्षा होणार; फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा, निर्मला सीतारामन यांची माहिती

IND vs ZIM : इतिहास फक्त 16 धावा दूर; पण शून्यावर बाद झाला तर अभिषेकच्या नावावर नकोसा विक्रम

Pune News: हवेलीत धक्कादायक प्रकार! ‘मुळा-मुठा’वरील २४ कोटींचा पूल पहिल्याच पुरात कोसळला; पीएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह..

SCROLL FOR NEXT