Grampanchyat election Sakal
महाराष्ट्र बातम्या

Gram Panchyat Election : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

जानेवारी २३ नंतर मुदत संपलेल्या राज्यातील २३५९ सार्वत्रिक आणि ३०८० पोट निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने कार्यक्रमा जाहीर केला.

पांडुरंग उगले

माजलगाव - जानेवारी २३ नंतर मुदत संपलेल्या राज्यातील २३५९ सार्वत्रिक आणि ३०८० पोट निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने कार्यक्रमा जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार (ता. २०) पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असून रविवारी (ता. पाच नोव्हेंबर) रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ता. सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील पहिल्या टप्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्यानंतर जानेवारी २०२३ नंतर दुसऱ्या टप्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपली होती. मुदत संपून नऊ महिने उलटले असतानाही या निवडणुका झाल्या नाहीत. अखेर निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्यातील दोन हजार ३५९ सार्वत्रिक तर, तीन हजार ८० रिक्त जागेवरील पोटनिवडणुक अशा एकूण पाच हजार ४३९ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा दिनांक – सोमवार (ता. १६)

  • नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक - शुक्रवार (ता. २०)

  • नामनिर्देशपत्र छाननी दिनांक, सोमवार (ता. २३)

  • नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक, बुधवार (ता. २५) वेळ दुपारी ३ पर्यंत

  • निवडणूक चिन्ह वाटप दिनांक – बुधवार (ता. बुधवार) दुपारी ३ नंतर

  • मतदान दिनांक – रविवार (ता. पाच नोव्हेंबर)

  • मतमोजणी दिनांक – सोमवार (ता. सहा नोव्हेंबर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT