Anti Corruption Bureau raid

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

लाभार्थीस घरकुलाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामसेवकाने शिपायामार्फत २० हजारांची लाच मागितली. त्यातील १२ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : लाभार्थीस घरकुलाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामसेवकाने शिपायामार्फत २० हजारांची लाच मागितली. त्यातील १२ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले. ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशांत प्रकाश मुकरे (वय ४७, रा. जुना कराड नाका, पंढरपूर) व शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे (वय ४५, रा. उंबरगाव, ता. पंढरपूर) अशी त्या दोघांची नावे आहेत.

उंबरगाव येथील एका बेघर लाभार्थीस पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले होते. त्याच्या घराचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित बांधकामासाठी मिळणारा शेवटचा हप्ता मिळावा, अशी त्याने गावच्या ग्रामसेवकाकडे मागणी केली होती. पण, ग्रामसेवकाने शिपायामार्फत त्या लाभार्थीकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. पण, १३ मार्च रोजी ग्रामसेवक नसल्याने ती रक्कम देता आली नाही.

१६ मार्च रोजी ग्रामसेवक गावात आल्यावर शिपायाने ग्रामसेवकासाठी म्हणून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिपायाला रकमेसह रंगेहाथ पकडले. त्याचबरोबर ग्रामसेवकाला देखील ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक अजित पाटील, उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र लांभाते, शैलेश पवार यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, स्वामीराव जाधव, अक्षय श्रीराम यांच्या पथकाने पार पाडली.

रक्कम कमी देऊनही स्वीकारलीच

घरकूल बांधकामासाठी अडीच लाखांवर खर्च होतो, पण शासनाकडून सध्या एक लाख २० हजार रुपयेच अनुदान मिळत आहे. वाढीव ५० हजार रुपये अनुदानाचा शासन निर्णय होऊनही ते अद्याप मिळत नाही. त्यातही एक लाख २० हजार रुपयातील २० हजार रुपयांची लाच ग्रामसेवकाने शिपायामार्फत मागितली हे विशेष. तडजोडीअंती १५ हजार रुपये द्यायचे ठरले आणि त्यातही तीन हजार रुपये कमी असताना देखील शिपायाने लाच घेतली. दोन्ही संशयित आरोपींच्या घराची झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT