file photo

 

sakal solapur

महाराष्ट्र बातम्या

ग्रामसेविकेने कार्यालयातच स्वीकारली लाच! रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी मागितले ५ टक्के; नोटांना पावडर, तरीपण ग्रामसेविका म्हणाल्या....

गावातील रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडे पाच टक्क्यांप्रमाणे ४६ हजार ५०० रुपयांची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता २६ हजार ५०० रुपये स्वीकारताना मोरोची गावच्या ग्रामसेविका पूजा लोंढे (वय ३८, रा. दहिगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १८) रंगेहाथ पकडले. ग्रामपंचायत कार्यालयातच त्यांनी लाचेची रक्कम घेतली होती.

तात्या लांडगे

नातेपुते : गावातील रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडे पाच टक्क्यांप्रमाणे ४६ हजार ५०० रुपयांची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता २६ हजार ५०० रुपये स्वीकारताना मोरोची गावच्या ग्रामसेविका पूजा लोंढे (वय ३८, रा. दहिगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १८) रंगेहाथ पकडले. ग्रामपंचायत कार्यालयातच त्यांनी लाचेची रक्कम घेतली होती.

माळशिरस पंचायत समितीअंतर्गत असलेल्या मोरोची गावात पूजा लोंढे या ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ठेकेदाराने दहिगाव-गुरसाळे रस्त्याचे काम केले होते. या कामाचे चालू व प्रलंबित बिल काढून देण्यासाठी ग्रामसेविकेने ठेकेदारांकडे पाच टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. चर्चेअंती ती रक्कम दोन हप्त्यात देण्याचे ठरले आणि त्यातील पहिला हप्ता बुधवारी (ता. १८) देण्याचे निश्चित झाले.

दुपारी दोन वाजता तक्रारदाराने दिलेले २६ हजार ५०० रुपये ग्रामसेविकेने घेतले आणि ती रक्कम स्वत:च्या ड्रॉव्हरमध्ये ठेवत असताना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र लंबाते यांच्या फिर्यादीवरून ग्रामसेविकेविरुद्ध नातेपुते पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

नोटांना पावडर अन्‌ ग्रामसेविका म्हणाली...

लाच मागणाऱ्या ग्रामसेविका पूजा लोंढे यांना रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तत्पूर्वी, त्या नोटांना पावडर लावलेली होती. अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर ग्रामसेविकेने रक्कम आपली नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला, पण नोटांना पावडर लावल्याने कारवाईपासून त्यांचा बचाव होऊ शकला नाही. दरम्यान, महिला असल्याने त्यांना अटक झाली नाही, पण नोटीस बजावण्यात आली आहे. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतील. त्यावेळी ग्रामसेविकेला न्यायालयात हजर केले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT