महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी sakal
महाराष्ट्र बातम्या

रोजगार हमी अन्‌ घामाला दाम कमी! ४१ अंश सेल्सिअस तापमानात काम, पण मजुरी २७३ रुपयेच; दुष्काळामुळे जिल्ह्यातील १०,००० मजूर रोजगार हमीच्या कामावर

सरकारी नोकरदारांना महागाईमुळे महागाई भत्ता वाढीव मिळाला, 7व्या वेतन आयोगानुसार पगारवाढही झाली, मात्र ‘रोहयो’त काम करणाऱ्यांची मजुरी केवळ 17 रुपयांनी वाढली. भर उन्हात 41 अंश तापमानात काम करूनही दररोज 273 रुपये मजुरी मिळत आहे. 3 दिवसांतच सोलापूर जिल्ह्यात 549 मजुरांनी काम सोडून दिले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नैसर्गिक आपत्तीत विशेषत: दुष्काळात गावागावातील बेरोजगारांवर घर सोडून परजिल्ह्यात जाण्याची वेळ येवू नये म्हणून ‘रोहयो’तून प्रशासनातर्फे कामे उपलब्ध करून दिली जातात. परंतु, सरकारी नोकरदारांना महागाईमुळे महागाई भत्ता वाढीव मिळाला, सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढही झाली, मात्र ‘रोहयो’त (रोजगार हमी योजना) काम करणाऱ्यांची मजुरी केवळ १७ रुपयांनी वाढली. भर उन्हात ४१ अंश तापमानात काम करूनही दररोज २७३ रुपयेच मजुरी मिळत आहे. तीन दिवसांतच सोलापूर जिल्ह्यात ५४९ मजुरांनी काम सोडून दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून इतर तालुक्यांतील बाराशे महसूल मंडळांमध्येही दुष्काळसदृश स्थिती जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ३६ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ‘रोहयो’ची ३८८ कामे सुरू असून त्याठिकाणी सध्या नऊ हजार ९१४ मजूर काम करीत आहेत. तर राज्यातील साडेनऊ हजार कामांवरील मजुरांची संख्या चार लाख ३७ हजारांपर्यंत आहे. पावसाळ्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जमिनीतील पाणीपातळी सव्वामीटरने खोल गेली आहे.

दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून आता पाऊस पडेपर्यंत शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही, अशी स्थिती आहे. पाण्याअभावी शेती ओस पडली असून पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची चिंता लागली आहे. मुलीचा विवाह, मुलांचे शिक्षण आणि बॅंक व खासगी सावकारांचा डोक्यावरील कर्जाचा बोजा या चिंतेतील गरजू लोक कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘रोहयो’च्या कामावर जात आहेत. पण, दिवसाला अवघी २७३ रुपयांची मजुरी मिळत असल्याने दिवसेंदिवस या कामांवरील मजूर कमी होत असल्याची स्थिती आहे.

बार्शी, पंढरपूर, माढ्यात सर्वाधिक मजूर

जिल्ह्यातील बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये देखील दुष्काळाची दाहकता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्थलांतर केले असून अजूनही काहीजण स्थलांतराच्या तयारीत आहेत. सद्य:स्थितीत रोजगार हमी योजनेच्या कामावर बार्शी तालुक्यात सर्वाधिक एक हजार ९९१, माढा तालुक्यात एक हजार ९९० तर पंढरपूर तालुक्यात एक हजार ८१७ मजूर काम करीत आहेत. मंगळवेढा, मोहोळ, करमाळा, अक्कलकोट या चार तालुक्यांमध्ये साडेसातशे ते सव्वाआठशे मजूर ‘रोहयो’वर काम करीत आहेत. मजुरी कमी असल्याने अनेकजण पर्यायी रोजगाराच्या शोधात आहेत.

दुष्काळी कामांना आचारसंहितेचा अडथळा नाही

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सुरु असलेली कामे सुरु राहतील, त्याला आचारसंहितेची अडचण नाही. दुष्काळासंदर्भातील कामांसाठी आचारसंहितेचा अडथळा नाही. त्यामुळे पूर्वी मंजूर झालेली व सुरु असलेली कामे सुरू राहतील.

- ईशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT