Signs of cyclone  sakal media
महाराष्ट्र बातम्या

गुलाब चक्रीवादळ : अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मिलिंद तांबे

मुंबई : गुलाब चक्रीवादळ (Gulab cyclone) पूर्व किनारपट्टीकडे (East Coastline) सरकत असून सोमवारी मध्यरात्री गोपाळपूर (Gopalpur) आणि कलिंगपटणम किनारपट्टीवर धडकणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर (maharashtra) देखील होणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढी दोन ते तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची (heavy rainfall) शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे विदर्भ, मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी ( ता. 27) मराठवाडा आणि विदर्भात, मंगळवारी (ता. 28) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाचा अंदाज आहे. शिवाय या दरम्यान वाऱ्यांचा वेग अधिक राहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मंगळवार (ता.28) पासून पुढील दोन ते तीन दिवस कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवार (ता. 27) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद मध्ये मुसळधार पावसाची आणि जोराचे गार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाबरोबर जोराचे गार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी (ता. 27) ला चंद्रपूर ला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवार (ता.28) ला पालघर,ठाणे,रायगड,धुळे,जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर मुंबई,रत्नागिरी,नंदुरबार, नाशिक,अहमदनगर,पुणे,औरंगाबाद जिह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

10th Pass Govt Jobs: दहावी पास असाल? मग ही दिल्लीतील सरकारी नोकरी चुकवू नका, लगेच करा येथे अर्ज

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT