gulabrao patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gulabrao Patil: ''मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. मग राज्यपाल असो की राष्ट्रपती'' गुलाबरावांनी दिला इशारा

संतोष कानडे

मुंबईः एकामागून एक भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं करीत आहेत. राज्यपालांच्या विधानानंतर तर राज्यभरात संताप व्यक्त होतोय. त्यावरुनच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोखठोक विधान केलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवरायांच्या बाबतीत कोणत्याही 'मायच्या लाल'ला बोलण्याचा अधिकार नाही. मग कुणीही असो. राज्यपाल असो की राष्ट्रपती असो. छत्रपती हे देवांचे देव आहेत. त्यांच्यापेक्षा कुणीही मोठं नाही.

हेही वाचा: Swasthyam 2022: तुम्ही का अस्वस्थ होता, हे समजण्याचा सोपा मार्ग

''मंत्रिपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण राज्यपालांना सोडणार नाही. महाराजांबद्दल चुकीचं बोलणारा तो कुणीही असो वा कुठल्याही पक्षाचा असो... चुकीला माफी नाही'' असा इशाराच त्यांनी दिलाय.

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचं सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT