Gulabrao Patil 
महाराष्ट्र बातम्या

Gulabrao Patil : शिंदे गटाला सारखाच वाटा मिळेल, त्यात गडबड होणार नाही; गुलाबरावांचा दावा

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे सहाजिकच सत्तेत तिसरा वाटेदार आल्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कलह सुरू झाल्याचं दिसून येत आहे. सातत्याने शिंदे गटाचे आमदार राष्ट्रवादीला मिळणाऱ्या खात्यांना विरोध करत आहेत. मात्र पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाला मिळणाऱ्या वाट्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता. तसेच अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे असल्याने निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिंदे गटाला वाटा सारखाच मिळेल. त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे.

एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले, तीन वाटेकरी झाल्याने आणि मात्तबर नेते असल्याने सन्मानाचं खातं देणं आवश्यक होत. मात्र मागच्या सरकारप्रमाणे होणार नाही. आता फाईल मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जाणार आहे. त्यामुळे संतुलित काम होईल, गडबड होणार नाही, असं पाटील यांनी नमूद केलं.

अर्थ खाते अजित पवारांकडे असलं तरी आपण मुख्यमंत्री असल्याने आमदारांना काहीच अडचणी येणार नाहीत असं वक्तव्य कोल्हापूरच्या सभेत एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यावर गुलाबराव पाटील यांनी कोल्हापूर येथे ही प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT