Gulabrao Patil_Sushma Andhare 
महाराष्ट्र बातम्या

ह्यांना पिक्चरमध्ये नटीची गरज होतीच; गुलाबरावांचं सुषमा अंधारेंविषयी वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील दोन ते तीन दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद पेटला आहे. अंधारे यांनी शुक्रवारी मुक्ताईनंगरमध्ये सभा घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. आता गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. (Gulabrao Patil News in Marathi)

गुलाबराव पाटील म्हणाले की, ह्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई किवा नटी पाहिजे असते, तशी यांनाही नटीची गरज होती. त्यामुळे यांनी आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. या बाईने आमच्या दैवताला शिव्या दिल्या. बाळासाहेबांच्या हातात तलवार दिल्यावर हात थरथरतील, उद्धवजी तुम्ही खाली उभे राहा आणि आदित्य यांना गोविंदा करा, असं म्हणणारी बाई यांना चालते, अशी टीका पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.

सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी गुलाबराव रपाटील यांच्यावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, माझ्यामुळं आमचा गुलाब भावड्या खूपच घाबरलाय. माझ्यासारख्या तीन महिन्याच्या बाळाला एवढ्या मोठ्या अनुभवी माणसानं घाबरावं, बाळ कीरकीर करतंय तर करु द्या, ना घाबरताय कशाला. मी तीन महिन्याचं बाळ असून आपुलकी कमावली तुम्ही काय कमावलं गुलाबराव? असा सवालही अंधारे यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT