Dadar Shivaji Park Shivtirth esakal
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेब ठाकरेंनी लावलेले शिवाजी पार्कवरील झाड कोसळले

दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे.

धनश्री ओतारी

दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. कोसळलेले गुलमोहराचे झाड हे बाळासाहेबांनीच लावले होते.(Gulmohar Tree Planted By Balasaheb Thackeray Fell At Dadar Shivaji Park Shivtirth)

बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क यांचे नाते सर्वांना परिचित आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या सभेनी शिवाजी पार्क भरुन जायचा. याच शिवाजी पार्कच्या मैदानावरती बाळासाहेबांनी आपल्या हातांनी एक गुलमोहराचे झाड लावलं होतं. तर बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे स्मृतीस्थळ याच झाडाच्या जवळ उभारण्यात आले होते.

रविवारी रात्री मुंबईत झालेल्या पावसामुळे शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याची माहिती येथे काम करणाऱ्या व्यक्तीने किशोरी पेडणेकर यांना दिली. हे झाड पडल्याने स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळीच स्मृतीस्थळावर जाऊन पाहणी केली.

त्यानंतर पेडणेकर यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट देत घटनेची पाहणी केली. दरम्यान, कोसळून पडलेले गुलमोहराचे झाड शिवाजी पार्कवरतीच पुनर्रोपीत करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT