Gunratan Sadavarte
Gunratan Sadavarte esakal
महाराष्ट्र

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

'आंदोलन करणारे संपकरी-कष्टकरी दहशतवादी नाहीयत, त्यांना दहशतवादी म्हणून संबोधित करू नका.'

मुंबई : एसटी महामंडळाचं (ST Workers) राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारनं अमान्य केल्यानं आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी धडक दिली. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजीही केली. त्यामुळं या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या आंदोलनानंतर वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratan Sadavarte) यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

अ‍ॅड. सदावर्ते म्हणाले, या घटनेनंतर गृहमंत्री आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा झालीय. त्यामुळं आमचा (आंदोलन) खून केला जाऊ शकतो. शरद पवारांचं राजकारण हे जातीय आणि गलिच्छ आहे. आंदोलन करणारे संपकरी-कष्टकरी दहशतवादी नाहीयत, त्यांना दहशतवादी म्हणून संबोधित करू नका. कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये आजवर एकदाही शिवी अथवा मारामारीची अशी कोणतीही घटना घडलेली नाहीय, ते त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत; पण सरकार त्यांना न्याय देत नसल्याचा आरोप सदावर्तेंनी केलाय.

एसटी संपाबाबत मी न्यायालयात युक्तीवाद करत असताना माझ्या कानावर ही बातमी आली. मी त्यांना थांबायला सांगितलं. मी व्हिडिओ पाहिला. काही कष्टकरी महिला व्यथित झालेल्या दिसतायत, काही महिलांना चक्कर आलेली दिसतेय आणि खासदार सुप्रिया सुळे तिथं दिसताहेत, चर्चा करायची आहे असं त्या म्हणतायत, याआधी सुप्रिया सुळे यांनी या कष्टकऱ्यांना चर्चेसाठी कधी बोलावलं होतं. हे त्यांनी आधी स्पष्ट करावं, असं अॅड सदावर्ते यांनी म्हटलंय.

उच्च न्यायालयानं काल कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व याचिकाही फेटाळून लावल्या. तसंच विलीनीकरणाचा प्रश्नही निकाली काढला. मात्र, कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी, पेन्शन आणि पीएफ आदी देण्यास सांगितलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात जल्लोष केला होता. आज पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर सदावर्ते यांनी सरकारला इशारा दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT