gunaratna sadavarte jayashree patil 
महाराष्ट्र बातम्या

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Gunaratna Sadavarte ST Bank: एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

कार्तिक पुजारी

मुंबई- अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. सदावर्ते दाम्पत्याचे एसटी बँकेचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. तज्ज्ञ संचालक म्हणून ते या पदावर राहू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

संदीप शिंदे यांनी सांगितलं की, सदावर्ते पती-पत्नींचे एसटी बँकेवरील संचालक पद रद्द झालं आहे. जेव्हा पासून सदावर्ते यांची सत्ता एसटी बँकेवर आली, तेव्हापासून ही बँक खड्ड्यात टाकण्याचं काम सुरु होतं. एसटी बँकेला खड्ड्यात घालण्यासाठीच काही निर्णय घेतले होते का, अशी शका घेण्यास वाव आहे.

कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाहीत. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदावर्ते यांनी जे विषय आणले होते, जे पोटनियम आणले गेले त्याची माहिती सदस्यांना देण्यात आली नाही. याची तक्रार मी एसटी कामगार संघटनेतर्फे सहकार खात्याकडे केली होती. पोटनियमांची माहिती सभासदांना दिली नाही याची दखल घेऊन, त्यांनी जे काही निर्णय घेतले होते त्यांना रद्द ठरवण्यात आले आहे, असं संदीप शिंदे यांनी सांगितलं.

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगारांनी मागील वर्षी मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनात सहभाग घेत सदावर्ते यांनी नेतृत्व स्वीकारलं होतं. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्त्वात आंदोलन मागे घेण्यात आले होते. एसटी बँकेच्या निवडणुकीमध्ये सदावर्ते यांची सत्ता आली होती. त्यानंतर एसटी बँकेच्या नियम, पोटनियमामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. यामुळे काही संघटनांमध्ये नाराजी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Accident Viral Video : आजोबा अन् २ नातवांना भरधाव 'थार'ने चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू; थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT