Gunaratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

वाशिमः अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित करुन नव्या मुद्द्याला हात घातला आहे. ते बुधवारी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एसटी महामंडळातील भ्रष्टाचारावरदेखील भाष्य केलंय.

वेगळ्या विदर्भाबद्दल बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, महाराष्ट्रातून विदर्भ राज्य वेगळं झालं पाहिजे, छोटे-छोटे राज्य निर्माण झाल्यास राज्याचा विकास होतो. याकरिता विदर्भ वेगळा झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

एसटी महामंडळातील भ्रष्टाचाराबद्दल सदावर्ते म्हणाले की, जुने भ्रष्टाचार काढायचे, चुकीचे फॉरेन्सिक रिपोर्ट लावायचे, स्वतः ईडच्या फेऱ्यात असलेल्यांना हे अधिकार आहेत का? माझ्याबद्दल बोलतात परंतु माझी मनमानी आहेच. कष्टकऱ्यांच्या या एसटी महामंडळातील संपूर्ण भ्रष्टाचार मी बाहेर काढणार असून कोणी आडवे आले तर पुन्हा ईडीकडे तक्रार करणार आहे.

एसटी सहकारी बँकेवर सध्या Adv. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलची सत्ता आहे. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर आक्षेप घेतला जात आहे. एकामागून एक चुकीचे निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप सभासदांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात सहकार आयुक्तांना एका सभासदानं पत्र लिहून तक्रार केलीय. याच मुद्द्यावरुन त्यांनी काही सभासदांना टार्गेट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT