Gunaratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सकाळ डिजिटल टीम

चार दिवसांपूर्वी सदावर्तेंना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती.

सातारा : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना आज (सोमवार) सातारा जिल्हा व सत्र न्यायालयानं (Satara Sessions Court) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीच सदावर्तेंना न्यायालयानं (Satara Court) पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली होती. त्याची मुदत आज संपल्यानं शहर पोलिसांनी सदावर्तेंना सातारा न्यायालयात हजर केलं. त्यानंतर सातारा पोलिसांनी तपासाच्या दृष्टीनं न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार कोर्टानं आपला निर्णय जाहीर केला आहे.

काय आहे प्रकरण?

दोन वर्षांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, ते गैरहजर राहिल्यानं सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज कोर्टानं मंजूर केला होता. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT