Gunratn Sadavarte
Gunratn Sadavarte Sakal
महाराष्ट्र

सदावर्तेंच्या गच्चीवरील बैठक ते हिशोबाची डायरी; वाचा कोर्टातील युक्तीवाद

दत्ता लवांडे

मुंबई : सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले मत्यानंतर त्यांना आता जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.८) ला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीत १३ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली होती.

(Gunratn Sadavarte Judicoial Custody For 14 Day's)

शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांच्या कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांकडून सरकारी वकील प्रदिप घरत यांनी युक्तीवाद केला आहे.

खालील गोष्टींवर झाला युक्तीवाद

आंदोलनाच्या ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या फूटेजवरुन हल्लाआधी त्या ठिकाणची पाहणी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आंदेलनावेळी सिल्वर ओक येथील गार्डनमध्ये सर्वजण जमले होते, या जमावाला अभिषेक नावाचा व्यक्ती मार्गदर्शन करत होता. त्यासंदर्भातील काही ऑडिओ क्लीपही पोलिस तपासात हाती लागल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली. त्याचबरोबर सदावर्ते यांनी विविध एसटी डेपोतील कामगारांकडून पैसे गोळा केले आहेत. यासंदर्भात पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली.

दरम्यान प्रदिप घरत यांनी कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलंय की, गुन्ह्यातील तपासातून आलेली माहिती धक्कादायक असून चंद्रकांत सुर्यवंशी यांना नुकतीच अटक केली आहे. त्याबरोबर या गुन्ह्यात कलम ४०६ आणि ४०९ यांचा सामावेश करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला असून लोकांच्या लक्षात न येण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून छोटी रक्कम उकळण्यात आली आहे. दरम्यान घेतलेल्या पैशांच्या पावत्या दिलेल्या नाहीत. ही रक्कम ही २ कोटींच्या वर जात असल्याची माहिती प्रदिप घरत यांनी दिली.

दरम्यान सुर्यवंशी यांच्या तपासात सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर रात्री ११ ते पहाटे २.५० पर्यंत बैठक पार पडली होती. त्यामध्ये जयश्री पाटील, नागपूरची व्यक्ती आणि इतर लोक उपस्थित होते. त्यावेळी जयश्री पाटील यांनी मार्गदर्शन केलं होतं. सध्या त्या फरार असून ८ एप्रिलला सदावर्ते यांनी नागपूरच्या व्यक्तीला फोन केला होता तेव्हा तो व्यक्ती मुंबईतंच होता. तीच व्यक्ती आंदोलन हाताळत होती अशी माहिती घरत यांनी कोर्टात दिली. नागपूरच्या व्यक्तीने अभिषेकला फोन करुन कामगारांना सिल्वर ओक येथे बोलावलं होतं आणि त्यानंतर पत्रकारांना मेसेज पाठवला. अभिषेक, जयश्री पाटील आणि अटक करण्यात आलेला चंद्रकांत सुर्यवंशी यांचा तपास समोरासमोर होणं गरजेचं आहे कारण तपासातील स्पष्टता समोर येणं गरजेचं आहे. कारण जवळपास २ कोटी सदावर्तेंना आणि ८० लाख रुपये जयश्री पाटील यांना देण्यात आले आहेत असा युक्तिवाद घरत यांनी कोर्टात केला.

तसंच सदावर्ते यांनी सर्व पैशांचा हिशोब डायरीत लिहून ठेवला आहे. ती डायरी पोलिसांच्या हाती लागलू असन यातील लिहिलेल्या नावांची तपासणी होणं गरजेचं आहे. तसेच सिल्वर ओक, सदावर्ते यांची सोसायटी आणि पेट्रोल पंप येथील सीसीटीव्हीचा तपास करणं गरजेचं आहे. त्याच्या आधारे आरोपींचा मुख्य सहभाग निश्चित होऊ शकतो. त्यासाठी आरोपीची कस्टडी महत्त्वाची आहे. असं घरत यांनी सांगितलं. त्याबरोबर आरोपींनी मद्यपान केल्याच्या संशयावरुन त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच कामगारांनी पिलेली दारु ही आझाद मैदान येथे आणली गेली होती का हा तपासाचा भाग आहे. चंद्रकांत सूर्यवंशी हा या गुन्ह्यातील महत्त्वाचा व्यक्ती असून त्याची इतर आरोपींच्या समोरासमोर चौकशी होणं गरजेच आहे. आर्थिक गुन्ह्याच्या तपासणीसाठी वेळ लागतो. या प्रकरणात झालेले गैरव्यवहार दाखवणं गरजेचं आहे. या प्रकरणाला वेगळा रंग दाखवण्यात आला आहे. सदावर्तेंनी आपण फी न घेता कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असल्याचं सांगितलं होतं. पण त्यांनी नागरिकांना अंधारात ठेऊन पैसे उकळले असतील तर हा मोठा गुन्हा असून त्याच्या चौकशीसाठी ७ दिवसांची कस्टडी मिळायला हवी असा युक्तीवाद घरत यांनी कोर्टात केला.

दरम्यान आरोपींच्या वकीलांनी बोलताना म्हटलंय की, केलेल्या आरोपात कसलंच तथ्य नसून हे आरोप हे पुराव्यांअभावी केले आहेत. ज्यासाठी गुन्हा नोंदवला त्याअनुषंगाने तपास होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तपास हा नागपूरच्या दिशेने जात आहे. पोलिसांच्या तपासातून ठोस काही मिळालेलं नाही. ज्या नागपूरच्या व्यक्तीचं नाव घेतलं गेलं त्या व्यक्तीचा या आंदोलनामागे हात होता असेही काही पुरावे मिळालेले नाहीत. जो डेटा जमा करायला वेळ लागतो, ज्या गोष्टींसाठी वाढीव कोठडी मागितली आहे त्या गोष्टी अगोदरंच पोलिसांकडे आहेत.

फक्त नव्या आरोपींच्या नावाखाली कोठडी मागितली आहे. डायरीही अगोदरच जप्त करण्यात आलेली आहे, फक्त कागदपत्र ताब्यात घेतल्याने कोठडी मागितली आहे. तसेच जयश्री पाटील यांच्या या प्रकरणाशी काही संबंध नाही. जे पुरावे गोळा केले आहेत ते पुरेशे आहेत. आता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यायला हवी असा युक्तीवाद आरोपींच्या वकीलांनी कोर्टात केला.

दरम्यान यानंतर सदावर्ते आणि आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

सातारा पोलिस ताब्यात घेणार?

सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा पोलिस त्याच्यावर ताबा घेणार असल्याचं बोललं जात होत. त्यासाठी आता १७ एप्रिलपर्यंत सदावर्तेंना ताब्यात घेण्याची परवानगी सातारा पोलिसांना न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आता सातारा पोलिस कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतर सदावर्तेंना ताब्यात घेण्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT