Gunaratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

ST Strike l लवकरच दूध का दूध पानी का पानी होणार ;गुणरत्न सदावर्ते

लवकरच सत्य बाहेर येणार; गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एलजी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पोलिस ठाण्यात नेत असताना जबरदस्ती केली जाते का असा प्रश्न विचारत हो केली जातीय असं ते म्हणाले. लवकरच दूध का दूध पानी का पानी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लवकरच सत्य बाहेर येणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादीचे आध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना भडकावल्याच्या ठपका ठेवत कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची कोठडी सूनावण्यात आली आहे. तसेच १०९ जणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याचबरोबर आंदोलकांचे ॉमोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील यांच्यामुळे आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केलाय.

बदला घेण्यासाठी सदावर्ते यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे. पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग केला जात आहे. मोगलां प्रमाणे राज्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमच्या कुटुंबाला शरद पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून धोका आहे. या तिघांविरूध्द जमिनी गैरव्यवहार प्रकरणी मी ५०० पानांचा अहवाल सादर केला आहे त्यामुळे त्यांनी मोगलांप्रमाणे वागण्यास सुरुवात केली असल्याचेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

Nanded Accident : रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक; सेवानिवृत्त सहकार अधिकारी राजेश उल्लेवार यांचे निधन

SCROLL FOR NEXT