cm eknath shinde on uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दलचं सोडा, तुमचे कंटेनरमधले खोके काढू का? CM शिंदेंचा सूचक इशारा

संतोष कानडे

गुवाहटीः शिंदे गटाचा दोन दिवसांचा गुवाहटी दौरा आज आटोपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खोक्यांच्या मुद्द्यावरुनही शिंदेंनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं.

आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीमध्ये जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिवाय आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेतला. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. सगळ्यांना समाधान आणि आनंद वाटला. काल आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमचं जंगी स्वागत केलं. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही सोबत होते. जिथे आम्ही थांबलो तिथे मुख्यमंत्रीही आले होते. त्यांनी स्नेहभोजन दिल्याचं शिंदेंनी सांगितलं.

खोक्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना उत्तर देतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल. काल केसरकर यांनी सूचक विधान केलेलं आहेच. आता सगळ्या दुनियेला माहिती होईल, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना दिला.

त्यांची मानसिकता ढळली आहे- मुख्यमंत्री शिंदे

उद्धव ठाकरेंनी कालच्या बुलडाण्यातील सभेत शिंदे गटातील आमदारांना रेडे, खोके सरकार... असं संबोधल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव घेता टीका केली. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्येतून ते हे बोलत आहेत. सरकारबद्दल लोकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT