Friendship Goal  esakal
महाराष्ट्र बातम्या

तरूणांनो, एक आक्षेपार्ह पोस्ट उद्ध्वस्त करेल तुमचे आयुष्य! सोलापूर जिल्ह्यात ४ दिवसांत पाचजणांवर गुन्हा

सोशल मीडियावरील एक आक्षेपार्ह पोस्ट तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरू शकते. गुन्हा दाखल झाला की पुन्हा शासकीय नोकरी नाही, ना परदेशात शिक्षणाची संधी, हे तरुणांनी ध्यानात ठेवावे. पालकांनीही आपली मुले काय करतात, कोणासोबत फिरतात यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. पण, तरुणांनी त्याला बळी न पडता स्वत:चे आयुष्य, आपले आई-वडील, भाऊ-बहिणीचा विचार करावा. सोशल मीडियावरील एक आक्षेपार्ह पोस्ट तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरू शकते. एकदा गुन्हा दाखल झाला की पुन्हा शासकीय नोकरी नाही, ना परदेशात शिक्षणाची संधी, हे तरुणांनी ध्यानात ठेवावे. तसेच पालकांनीही आपली मुले काय करतात, कोणासोबत फिरतात यावर लक्ष ठेवण्याची आवश्‍यकता आहे.

सध्या तरुणांकडून व्हॉट्‌सॲप, ट्टिटर, फेसबुक व इन्स्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मागील साडेतीन वर्षांत तरुणांनी साडेचौदा हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केल्या आहेत.

तर यावर्षी सायबर पोलिसांनी ३७८ आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या आहेत. दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल आणि त्यातून सामाजिक शांतता-सुव्यवस्था बिघडविण्याचे कृत्य करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा वॉच आहे. काहीजण विनाकारण औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून करीत आहेत. परंतु, धार्मिक व जातीय सलोखा ठेवून सर्वांनी मैत्रिपूर्ण नातेसंबंध जोपासावेत.

गुन्हा दाखल झाल्यावर सोडवायला कोणीही येत नाही. त्यावेळी तुरुंगातील मुलाला पाहून आपल्या आई-वडिलांचे, शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या भावाचे, विवाहाच्या वयात आलेल्या बहिणीचे काय हाल होतील, याचाही तरुणांनी नक्की विचार करण्याची गरज आहे. आई-वडिलांनी लहानाचे मोठे करताना तुमच्याबद्दल खूपकाही स्वप्ने रंगवलेली असतात. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे, सोशल मीडियावर तेढ निर्माण करणारे स्टेट्स ठेवणे असे प्रकार टाळावेत, अन्यथा दोन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास अटळ असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तरूण-अल्पवयीन मुलांनी शिक्षणातून स्वप्नपूर्ती करावी

दोन जाती-धर्माच्या भावना दुखावतील, अशा आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमातून व्हायरल करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुले, महाविद्यालयीन तरुणांचाही समावेश आहे. पण, तो दखलपात्र अपराध असून एक पोस्ट आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरू शकते. नागरिकांनीही अशी पोस्ट पाहिल्यास कायदा हातात न घेता जवळील पोलिस ठाण्यास कळवावे. संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

आतापर्यंत चार पोलिस ठाण्यात गुन्हे

कोल्हापुरातील घटनेनंतर राज्यातील पोलिस ॲक्शन मोडवर आहेत. वळसंग पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका तरुणाने औरंगजेबाचे उदात्तीकरण होईल व धार्मिक तेढ निर्माण होईल, असे स्टेट्‌स व्हॉट्‌सॲपला ठेवल्याने गुन्हा दाखल झाला. शोएब मंगळूरकर (वय २०) असे त्या तरुणाचे नाव असून तो आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. अशाचप्रकारे अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे परिसरातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे शिव दहिहंडे या २९ वर्षीय तरुणावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जोडभावी पोलिस ठाण्याअंतर्गत चाँद उर्फ मुन्ना बागवान याच्याविरूद्ध देखील तसाच गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Pawna Dam News : पवना धरण परिसरातील अतिक्रमणावर पाटबंधारे विभागाची जोरदार कारवाई!

Pune Municipal Election : मतदारांच्या पळवापळवीने इच्छुकांचे धाबे दणाणले

Ambegaon News : २५०० पशुधनावर एकच दवाखाना; एक्स-रे, सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधा देणारे ‘तालुका सर्वचिकित्सालय’ रखडले!

SCROLL FOR NEXT