mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सप्टेंबरमधील अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील सात लाख ९८ हजार ९१० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना भरपाईपोटी राज्य शासनाकडून तीन हेक्टरच्या मर्यादेत ९४९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधीही मिळाला. मात्र, एकूण बाधितांपैकी ४७ टक्के शेतकऱ्यांना भरपाईचा दमडाही मिळालेला नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सप्टेंबरमधील अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील सात लाख ९८ हजार ९१० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना भरपाईपोटी राज्य शासनाकडून तीन हेक्टरच्या मर्यादेत ९४९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधीही मिळाला. मात्र, एकूण बाधितांपैकी ४७ टक्के शेतकऱ्यांना भरपाईचा दमडाही मिळालेला नाही. विशेष बाब म्हणजे दिवाळीपूर्वी बाधितांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली होती.

सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, पंढरपूर व करमाळा या चार तालुक्यात प्रत्येकी ९२ ते ९९ हजार शेतकरी बाधित आहेत. मोहाळ, सांगोला तालुक्यात दीड लाखांहून अधिक तर अक्कलकोट, माळशिरस व मंगळवेढा या तालुक्यात प्रत्येकी ५० हजारांवर शेतकऱ्यांना भरपाई अपेक्षित आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील नऊ हजार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४ हजार आणि अप्पर मंद्रूप तहसीलच्या हद्दीतील ३० हजार शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. अ

ख्खा खरीप वाया गेला, दिवाळी देखील आनंदात साजरा करता आली नाही. अनेकांचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला. अशा स्थितीत सर्व बाधितांना दिवाळीपूर्वी किंवा दिवाळी संपण्यापूवी तरी मदत अपेक्षित होती. मात्र, दिवाळी संपल्यानंतरही निम्मा जिल्हा भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आकडेवारीतून समोर आली आहे. मदत न मिळालेल्यांपैकी बहुतेक शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही. त्यांना भरपाईसाठी ई-केवायसी करावी लागणार आहे.

अतिवृष्टीच्या मदतीची सद्य:स्थिती

  • एकूण बाधित शेतकरी

  • ७,९८,९१०

  • भरपाईपोटी मिळालेला निधी

  • ९४९.५३ कोटी

  • मदतीच्या प्रतीक्षेतील शेतकरी

  • ३,९५,३२८

  • भरपाईची प्रलंबित रक्कम

  • ४६९.३५ कोटी

कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी राहिले...

जिल्हा प्रशासनाकडील रिपोर्टनुसार अक्कलकोट तालुक्यातील ३३ हजार ८०७ शेतकरी, बार्शीतील ५७ हजार ३७१ शेतकरी, करमाळ्यातील ३२ हजार ५३९ शेतकरी, माढ्यातील ६० हजार ५७२ शेतकरी, माळशिरस तालुक्यातील ३६ हजार ८२० शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. तसेच मंगळवेढ्यातील ३३ हजार १९ शेतकरी, मोहोळमधील २३ हजार ६८ शेतकरी, पंढरपूरमधील ४० हजार १४६, सांगोल्यातील ४९ हजार ६६९ शेतकरी, उत्तर सोलापुरातील सहा हजार २५८, दक्षिण सोलापुरातील नऊ हजार ३७८ शेतकरी व अप्पर मंद्रूप तहसीलच्या हद्दीतील १२ हजार ९५२ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT