solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

गावागावात हातभट्टी विक्री! पतीच्या मृत्यूनंतर 2 चिमुकल्यांना ‘ती’ एकटी सांभाळतेय; नव्या पोलिस अधीक्षकांचा उपक्रम ‘पहाट’; जुन्या एसपींचे ‘ऑपरेशन परिवर्तन’ बंद?

सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी तयार होणारी ५४ ठिकाणे व सर्वाधिक हातभट्टी विक्री होणारी ३५० गावांची माहिती ऑपरेशन परिवर्तन’ सुरू करण्यापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संकलित केली होती. पण, त्यांच्या बदलीनंतर कारवाईत सातत्य राहिले नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील जिल्ह्यातील हातभट्टी तयार होणारी ५४ ठिकाणे व सर्वाधिक हातभट्टी विक्री होणारी ३५० गावांची माहिती ऑपरेशन परिवर्तन’ सुरू करण्यापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संकलित केली होती. पण, त्यांच्या बदलीनंतर कारवाईत सातत्य राहिले नाही. आता ते बंदच पडल्याचे कारवाईच्या आकडेवारीतून दिसते. दुसरीकडे नव्या पोलिस अधीक्षकांनी अनुसूचित जाती-जमातीतील गुन्हेगारांसाठी ‘पहाट’ उपक्रम सुरू केला असून गुन्हेगारीच्या दलदलीतून त्या गुन्हेगारांना बाहेर काढण्याचा त्यामागीलचा हेतू आहे.

अवैध हातभट्टी दारु निर्मितीतून राज्यभर पोचलेल्या मुळेगाव तांड्याची ओळख २५ वर्षांत पोलिसांना पुसता आलेली नाही. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यात ११, उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी ९, करमाळ्यात सात, अक्कलकोट व सांगोला तालुक्यात प्रत्येकी सहा, पंढरपूर तालुक्यात तीन, मोहोळ तालुक्यात दोन, अशा गावांच्या हद्दीत हातभट्ट्या आहेत. या पार्श्वभूमीवर अवैध व्यावसायिकांना त्यापासून परावर्तित करणे, गावागावातील तरुणांमधील व्यसनाधीनता कमी व्हावी व गावागावातील भांडणतंटे कमी व्हावेत म्हणून ‘ऑपरेशन परिवर्तन राबविण्याचा निर्णय झाला.

संपूर्ण माहिती संकलित करून गावे पोलिस अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आली. हातभट्ट्यांवर आठवड्यातून किमान तीनवेळा अचानक धाडी टाकल्या. जेणेकरून नफ्यापेक्षा तोटाच अधिक होईल आणि तो व्यक्ती व्यवसाय सोडून देईल, असा त्यामागील हेतू होता. पण, सध्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ची जागा ‘पहाट’ने घेतली असून त्याअंतर्गत गुन्हेगार पोलिस अधिकाऱ्यांना दत्तक दिले आहेत.

पतीच्या मृत्यूनंतर ‘ती’ एकटीच सांभाळतेय दोन चिमुकल्यांना

मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव केला, तरीपण हातभट्टी विक्री थांबली नाही. दारूच्या व्यसनात पती गेल्याने अनेक महिला तारुण्यातच विधवा झाल्या आहेत. एक वर्षापूर्वी ३५ वर्षाचा तरुण गावात सहजपणे मिळणाऱ्या हातभट्टीच्या आहारी गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सध्या त्या तरुणाची पत्नी एक मुलगा व एका मुलीला घेऊन एकटीच कुटुंबाचा गाडा चालवीत आहे. अशी उदाहरणे अनेक गावांमधील आहेत.

कारवाई नेमकी कोणी करायची?

राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ अवैध दारू वाहतूक, निर्मितीवर लक्ष ठेवणे, कारवाई करण्यासाठीच असून आम्हाला गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त अशी खूप कामे असतात, असे पोलिसांचे म्हणणे असते. पण, दोन्ही विभागांनी संयुक्तरीत्या सातत्याने कारवाई केल्यास निश्चितपणे हा व्यवसाय नियंत्रित होऊ शकतो, असा विश्वास सर्वांना वाटतो.

जिल्ह्यातील पोलिसांचे दोन्ही उपक्रम सुरूच

‘ऑपरेशन परिवर्तन’ हे हातभट्टीच्या अवैध व्यवसायाशी संबंधित असून त्या लोकांना रोजगार मिळवून देणे, व्यवसाय सुरू करण्यास बॅंकांच्या माध्यमातून मदत करणे असे आहे. याशिवाय पारधी समाजातील अनेकांकडे मूळ कागदपत्रे नसल्याने शिक्षण, नोकरी, शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांना गुन्हेगारीकडे वळायला लागू नये, गुन्हेगारांना त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी ‘पहाट’ उपक्रम सुरू केला आहे. दोन्ही उपक्रम महत्त्वाचे असून ते सुरू राहतील.

- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

‘ऑपरेशन परिवर्तन’नंतरही हातभट्टीची नशा वाढलेलीच

  • (डिसेंबर २०२३ अखेर)

  • एकूण केसेस : ४,५६६

  • जप्त माल : १.८० कोटी

  • (डिसेंबर २०२४ अखेर)

  • एकूण केसेस : ४,५७२

  • जप्त माल : ३.३७ कोटी

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी याहून जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT