solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

हातभट्टीची नशा वाढली! सोलापूर जिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त गावांमध्ये हातभट्टीची खुलेआम विक्री; कारवाईत सातत्य नाही; एक्साईज व ग्रामीण पोलिसांचे एकमेकांकडे बोट

हातभट्टीचा जिल्हा ही सोलापूरची राज्यभरातील ओळख कायमची मिटावी, हातभट्टीच्या आहारी गेलेले गावागावातील तरुण व्यसनमुक्त व्हावेत, नवविवाहितांचा संसार सुखाचा व्हावा, याची जबाबदारी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागावरच अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी ३२ हजारांवर लोकांचा मृत्यू होतो, त्यात हातभट्टी तथा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : हातभट्टीचा जिल्हा ही सोलापूरची राज्यभरातील ओळख कायमची मिटावी, हातभट्टीच्या आहारी गेलेले गावागावातील तरुण व्यसनमुक्त व्हावेत, नवविवाहितांचा संसार सुखाचा व्हावा, याची जबाबदारी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागावरच अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी ३२ हजारांवर लोकांचा मृत्यू होतो, त्यात हातभट्टी तथा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दारूबंदीचे ठराव देखील केले आहेत. तरीसुद्धा जिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त गावांमध्ये हातभट्टी खुलेआम विकली जाते हे विशेष. राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामीण पोलिसांनी या गावांची यादी देखील तयार केली होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी १ जानेवारीपासून साडेचार कोटींची तर ग्रामीण पोलिसांनी ४२ लाखांची हातभट्टी दारू व गुळमिश्रित रसायन नष्ट केले आहे. पोलिस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने ज्या ज्या वेळी हातभट्ट्यांवर कारवाई केली, त्यावेळी त्यांना पेटलेल्या हातभट्टी दिसल्याच आहेत. तरीदेखील, कारवाईत सातत्य नाही. पोलिस म्हणतात, ‘हातभट्टींवरील कारवाई हा आमच्या कामाचा प्रमुख भाग नाही’ आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी म्हणतात, ‘हातभट्टीशिवाय दुसरी देखील कामे आम्हाला असतात’. मनुष्यबळ कमी असल्याचेही कारण दोन्ही विभागाकडून दिले जाते. त्यामुळे गावागावात अवैध हातभट्टी व्यावसायिक वाढत आहेत. प्रशासकीय भाग सोडून या दोन्ही विभागांनी सामाजिक बांधिलकीतून पाहिल्यास निश्चितपणे हातभट्टीच्या व्यसनातून गावागावातील हजारो तरुण बाहेर येतील, असा विश्वास सर्वांनाच आहे.

विवाहितांची भरोसा सेलकडे धाव, पण...

सोलापूर शहर-जिल्ह्यात दरमहा सरासरी ४५० विवाहिता सासरच्या विशेषतः: पतीच्या त्रासाला कंटाळून पोलिसांकडील भरोसा सेलमध्ये तक्रारी करतात. बहुतेक तक्रारींमागे हुंडा, चारित्र्यावरील संशय यासह पतीचे दारू पिऊन भांडणे, अशीच कारणे आहेत. तरीसुद्धा त्या गावांमधील हातभट्टी ना पोलिसांना ना राज्य उत्पादन शुल्क विभागाला बंद करता आली.

मद्यपानामुळे यकृत खराब होऊन मृत्यू अधिक

दारूचे विशेषतः गावठी हातभट्टीचे सतत सेवन केल्याने लिव्हर सिरॉसिस होतो. त्यामुळे पोटात पाणी होते, पचनशक्ती कमी होऊन सतत उलटीचा त्रास होतो. दारू हे एकप्रकारचे ड्रग्ज असून त्यातून यकृतला (लिव्हर) जास्त काम लागते आणि ते खराब होते. दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात विविध कारणांमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये यकृतच्या संबंधित आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६ ते ७ टक्के आहे. त्यात मद्यपींची संख्या अधिक आहे.

- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT