Hanuman Sakal
महाराष्ट्र बातम्या

हनुमान जन्मस्थळावरून वाद; साधू महंतांमध्ये 'रामायण'

हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधेच्या मठाधिपत्यांनी केला आहे.

दत्ता लवांडे

नाशिक : त्र्यंबकेश्वर हनुमान जन्मस्थावरून सध्या वाद सुरू असून साधू आणि महंतामध्ये मतमतांतरे सुरू आहेत. त्यामुळे किष्किंधा मठाधिपत्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये ठाण मांडून आंदोलन सुरू केलं आहे. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधेच्या मठाधिपत्यांनी केला आहे. तर नाशिकमधील महंतांनी जन्मस्थळावरून मतमतांतरे निर्माण केली आहेत.

(Hanuman Birth Place Controversy)

राज्यामध्ये हनुमान चालीसावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण झाला आहे. किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती हे त्र्यंबकेश्वरमध्ये आले आहेत. त्र्यंबकेश्वरमधील साधूंनी त्यांच्या भेटीला यावे ही त्यांची इच्छा होती पण त्र्यंबकेश्वरमधील कोणीही साधू महंत त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले नाही. त्यामुळे त्यांनी ठाण मांडून आंदोलन सुरू केलं आहे.

दरम्यान किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंंद स्वामी सरस्वती यांनी वाल्मिकी रामायणातले काही पुरावे आणि संदर्भ देत हनुमानाचं जन्मस्थळ अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केला. हा वाद जुना असल्याचं बोललं जात आहे. नाशिकमधील किष्किंधामध्ये किंवा हरियाणातील काही हनुमानाचा ठिकाणी जन्म झाल्याचे दावे करण्यात आले होते.

रामजन्मभूमीचा वाद नुकताच संपला असताना पुन्हा हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काशी मथुरा मंदिराबाबतही सध्या वाद सुरू आहेत. दरम्यान केंद्राकडून हनुमानाचं मंदिर उभारण्यासाठी निधी दिला जात आहे. जगातील सर्वांत उंच हनुमानाची मुर्ती उभी करणार असल्याचं किष्किंधाच्या महंतांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर हनुमानाचा जन्म किष्किंधामध्ये झाला आहे त्यामुळे अंजनेरीच्या महंतांनी जन्मावरून दावा करू नये असं किष्किंधाच्या महंतांनी आणि मठाधिपत्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT