Raj Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

हनुमान चालिसाही पाच वेळा लावू!

राज ठाकरे यांचा इशारा : जशास तसे उत्तर देण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. मला राज्यातील शांतता बिघडावयाची नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र, सांगून देखील तुम्ही ऐकणार नसला आणि दिवसभरात पाच वेळा भोंगा लावणार असाल, तर मशिदीसमोर आम्ही देखील पाच वेळा हनुमान चालिसा लावू,’’ अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

भोंगाच्या विषयावरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गेले अनेक वर्ष हा विषय तसाच राहिला आहे. कोणी काही लिहिले नाही, म्हणून मला वाटले त्यावर बोलले पाहिजे. याचा त्रास फक्त हिंदूंनाच होतो आहे, असे नाही. तर मुस्लिम समाजाला देखील होत आहे. देशभरातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमझान सुरू आहे. मला काही करावयाचे नाही. परंतु, तीन तारखेपर्यंत त्यांना समजले नाही आणि सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा त्यांना धर्म मोठा वाटत असले, तर जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. मनसेच्यावतीने त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू आहे.’’

औरंगाबादला सभा; पाच जूनला अयोध्येत

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर ‘मी आता लवंड्यांवर फार बोलत नाही,’ असे सांगून अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे मी जाहीर सभा घेणार असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘येत्या पाच जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह औयोध्याला जाणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Amboli Tourist Accident : मुसळधार पाऊस अन् दाट धुक्यात धाडसी मोहीम! सह्याद्री रेस्क्यू टीमने 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला निपाणीतील डॉक्टराचा मृतदेह

Marathi News Live Updates : तारळी धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ९४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

SCROLL FOR NEXT