amitabh bachchan
amitabh bachchan 
महाराष्ट्र

Happy Birthday Big B : ‘महानायका’वर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

वृत्तसंस्था

मुंबई - अमिताभ बच्चन यांचा ७७ वा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर चाहत्यांनी गर्दी केली होती. ‘बिग बी’ यांनीही हात उंचावत सर्वांचे आभार मानले.

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांचा ७७ वा वाढदिवस शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. बॉलिवूडमधील दिग्गजांकडून तसेच चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याबद्दल ‘बिग बी’नी सोशल मीडियावरून सर्वांचे आभार मानले आहेत. 

‘वाढदिवसानिमित्त मला प्रेमपूर्वक शुभेच्छा देणाऱ्यांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानणे शक्‍य नाही; पण तुम्ही प्रत्येक जण माझ्या हृदयात आहात. अनेक अनेक धन्यवाद,’ असे ट्‌विट अभिताभ बच्चन यांनी केले आहे. अन्य एका ट्‌विटमध्ये अमिताभ यांनी म्हटले आहे की, काळानुसार गोष्टी बदलत जातात. माझ्या वडिलांच्या कवितांची तसेच माझ्या वाढदिनी आईचा उत्साह मला आठवत आहे. या दिवशी केक कापण्यात आता मला रस वाटत नाही. केकची जागा आता सुकामेव्याने घेतली आहे.

अमिताभ यांची लाडकी लेक श्‍वेता बच्चन यांनी त्यांना सर्वांत प्रथम शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही पर्वताच्या शिखरावर पोचलात तरी वर चढत राहा...

वाढदिवसाच्या शुभेच्या पप्पा, तुमच्यावर निरंतर प्रेम करीत राहीन,’ असे श्‍वेता बच्चन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बच्चन कुटुंबाप्रमाणेच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी अमिताभ यांना शुभेच्या दिल्या. यात ज्येष्ठ अभिनेते व राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा तसेच माधुरी दीक्षित, अनुपम खेर, फरहान अख्तर, अजय देवगण, नेहा धुपिया, परिणीती चोप्रा, मधुर भांडारकर आदींनी ट्‌विट करीत छायाचित्रेही पोस्ट केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT