Happy New Year 2024  esakal
महाराष्ट्र बातम्या

Happy New Year 2024 : नव्या अपेक्षा.. नवे संकल्प! नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत; रोषणाई, आतषबाजी अन् सुरांच्या मैफिली...

सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं आगमन झालं आहे. देशभरात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.

संतोष कानडे

मुंबईः सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं आगमन झालं आहे. देशभरात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. थर्टीफस्टच्या जल्लोषात तरुणाईने धम्माल केली. नवी स्वप्न आणि नव्या संकल्पांचं हे वर्ष सर्वांनासाठी अपेक्षापूर्तीचं ठरो, अशा शुभेच्छा एकमेकांना देण्यात आल्या.

राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, सातारा या शहरांमध्ये पर्यटकांनी गर्दी केली होती. शिवाय कित्येक जणांनी राज्याबाहेर जात अनंदोत्सव साजरा केला. मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यावर तरुणांनी गर्दी केली होती. पुण्यात रस्त्यारस्त्यावर उत्साह सळसळत होता.

सर्वत्र जल्लोष, उत्साह आणि नृत्याच्या ठेका धरताना तरुणाई दिसून आली. अशा आनंदाच्या अन् उत्साहाच्या वातावरणात नव्या वर्षाचं स्वागत झालं. मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आलेली होती. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

महत्त्वाचं म्हणजे यंदा नूतन वर्षाचं स्वागत हे संगीत मैफिलींनीही करण्यात आलं. रात्रभर सूरांच्या सानिध्यात नव्या पहाटेचं स्वागत होत आहे. मोठ्या शहरांमध्ये बंदिस्त मैफिती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी नागरिकांना नवीन वर्षांच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. तर त्यांनी रक्तदान करुन नवीन वर्षांचं स्वागत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT