पत्नीचा छळ sakal media
महाराष्ट्र बातम्या

मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढतोय संशय! ६ महिन्यांत ७८२ महिलांच्या सासरच्यांविरूद्ध पोलिसांत तक्रारी; २२४ महिलांची घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव

जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांत सोलापूर शहरातील तब्बल ७८२ महिलांनी सासरच्यांविरूद्ध पोलिसांत धाव घेतली आहे. त्यातील २२४ महिलांनी घटस्फोटासह विविध कारणांसाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतल्याचे पोलिसांकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : विवाहात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, महागडे साहित्य दिले नाही, दागिने कमी दिले, स्वयंपाक नीट येत नाही, घरातील कामे करत नाही यासह सतत मोबाईलवर असते, नेहमीच मोबाईलवर बोलतेय आदी कारणांतून चारित्र्यावरील संशयातून विवाहितांचा छळ वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांत सोलापूर शहरातील तब्बल ७८२ महिलांनी सासरच्यांविरूद्ध पोलिसांत धाव घेतली आहे. त्यातील २२४ महिलांनी घटस्फोटासह विविध कारणांसाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतल्याचे पोलिसांकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

हुंडा घेणे व देणे हा गुन्हा असूनदेखील बड्या कुटुंबांसह बहुतेकजण थेट हुंडा मागत नाहीत, पण दागिने, वाहन, बंगला, महागडे कपडे अशा वस्तू मागतात. त्या वस्तू घेऊनही सासरकडील अनेक कुटुंबीय सुनेला किरकोळ कारणातून त्रास देतात. नवविवाहिता असल्याने मोबाईलवरून सतत माहेरच्यांशी, मैत्रिणींशी बोलत असते, पण मोबाईल हिसकावून घेणे, पुन्हा मोबाईल द्यायचाच नाही किंवा साधा मोबाईल द्यायचा, असे प्रकारही सुरू असतात.

अशावेळी अनेकदा माहेरील लोक आपल्या मुलीला कसे वागायचे, सासू-सासऱ्याला कसे बोलायचे हे शिकवतात आणि पती-पत्नीतील वाद वाढतो, अशीही उदाहरणे आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यात बालविवाह वाढले असून अल्पवयात विवाह झाल्याने मुलीला संसाराची माहिती नसते आणि त्यातूनही वाद होतात, असे पोलिस अधिकारी सांगतात.

पती-पत्नीचे कमी-अधिक पॅकेजही ठरतेय वादाचे कारण

विसंवाद, संशय आणि हुंडा (मानपान) यातून वाढलेले भांडण घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज करण्याएवढे टोकाला जात आहे. मुलगा किंवा मुलीचे शिक्षण, नोकरी आणि एकमेकांचे कमी-अधिक पॅकेज हे देखील वादाचे कारण बनल्याचीही उदाहरणे आहेत. अशा वेगवेगळ्या कारणांवरून दरमहा सरासरी १२५ ते १५० महिला सासरच्यांविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी देतात, असेही पोलिसांकडील नोंदीवरून दिसते.

सोलापूर शहरातील तक्रारी

  • जानेवारी ते जूनअखेर

  • ७८२

  • पती-पत्नीत समझोता

  • ३३१

  • पोलिसांत गुन्हे दाखल

  • १८८

  • कौटुंबिक न्यायालयात गेलेले

  • २२४

  • प्रलंबित तक्रारी

  • ४०

महिलांच्या तक्रारी वाढत आहेत

सासरच्यांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यामागे मोबाईलचा अतिवापर व चारित्र्यावरील संशय, विवाहातील मानपान अशी प्रमुख कारणे आहेत. तक्रारदार पती-पत्नींचा संसार मोडू नये, तो पुन्हा सुखाचा व्हावा, यासाठी आमच्या भरोसा सेलमधून त्यांचे समुपदेशन केले जाते. तरीपण, अनेकजण पोलिसांत गुन्हा दाखल करतात तर अनेक महिला कौटुंबिक न्यायालयात धाव घेतात.

- धनंजय शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (महिला कक्ष), सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : लालबाग राजाची मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

SCROLL FOR NEXT