Hari Narke Death Update NCP leader Chhagan Bhujbal on demise of dr Hari Narke  
महाराष्ट्र बातम्या

Hari Narke Passed Away : हरी नरकेंच्या निधनाने छगन भुजबळ व्यथित; म्हणाले, हातपाय गळाल्यासारखी परिस्थिती...

रोहित कणसे

समता परिषदेचे उपाध्यक्ष आणि लेखक विचारवंत डॉ. हरी नरके यांचे मुंबईत हृदविकाराच्या झटक्याने निधन झालं. या बातमीनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ. हरी नरके आमच्यात नाहीत याचा मी विचार करू शकत नाही. फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेचं प्रचंड नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हरी नरकेच्या निधनाच्या बातमीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान छगन भुजबळ म्हणाले की, आता हातपाय गळाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल फार जुनी पुस्तकं शोधून काढून ऐतिहासिक लिखाण लोकांच्या पुढे आणण्याचं काम हरी नरके यांनी केलं असे छगन भुजबळ म्हणाले.

अनेक पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर हरी नरके यांनी तारीख-वार याबाबत वादविवाद करून महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचं काम लोकांना पटवून दिलं. महात्मा फुले समता परिषदेचे ते मोठा आधारस्तंभ होते. आता त्यांच्यासारखा अभ्यास करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा कोण भेटणार? असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे देखील भुजबळ म्हणाले.

हरी नरके हे मागील वर्षभर आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात १५-२० दिवस दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी ते राजकोट येथील रुग्णालयात गेले होते, तेव्हा त्यांनी मला बरं वाटतंय असं सांगितलं होतं. मी त्यांना मुंबई-पुण्यात चांगल्या डॉक्टरांकडे उपचार घेऊ असं सांगितलं होतं. पण त्यांनी फार लक्ष दिलं नाही, असंही भुजबळ म्हणाले.

आज ते मुंबईला येत असताना त्यांना प्रवासात सहा वाजताच गाडीत दोन उलट्या झाल्या. त्यानंतर समीर भुजबळ यांनी ड्रायव्हरला त्यांना एशियन हार्ट येथे घेऊन जाण्यास सांगितलं असेही छगन भुजबळ म्हणाले. ही अतिशय धक्कादायक आणि अतिशय दुखःदायक, मन सुन्न करणारी घटना असून यामुळे पुरोगामी चळवळीचं फार मोठं नुकसान झालं आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT