Haribhau bagde's reaction on Ajit pawar's resignation  
महाराष्ट्र बातम्या

म्हणून नानांही कळेना दादांच्या राजीनाम्याचे कारण !

अतुल पाटील

औरंगाबाद : 'आतापर्यंत ज्यांनी कुणी राजीनामा दिला, ते कुठल्या तरी नेत्यांना सोबत घेऊन आले होते. त्यामुळे ते कुठल्या पक्षात जाणार. हे स्पष्टपणे कळत होते. मात्र, अजितदादांचा राजीनामा हे कुठल्या कारणासाठी दिला किंवा काय करणार? याबाबत मला तरी काहीच कळेना झालंय.' अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे (नाना) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (दादा) यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर दिली. 

अजित पवार यांनी कोणत्या कारणासाठी राजीनामा दिला, याचे सर्वांनाच आश्‍चर्य आहे. अजित दादांनी दिलेल्या हस्ताक्षरातील राजीनाम्यात नेमके काय लिहिले आहे, याबाबत पत्रकारांनी नानांना प्रश्‍न विचारले. मात्र, नाना म्हणाले, 'त्यात काय लिहिले आहे. हे मी सांगू शकत नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मला कुठे आहात असे विचारले. औरंगाबादमध्ये आहे सांगितल्यावर त्यांनी आज अचानक मुंबईतील कार्यालयात येत हस्ताक्षरातील राजीनामा दिला. त्यांच्यासोबत कोण होते? हे माहित नाही. यापूर्वी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, त्यावेळी त्या आमदारांसोबत जे कोणी नेते होते, त्यामुळे कळत होते. हे आमदार राजीनामा देऊन कुठे जाणार आहेत. मात्र, अजितदादांबाबत असा कोणताच अंदाज लावला जाऊ शकत नाही. अजितदादांना मी खोदून विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी राजीनामा मंजुर करण्याची विनंती केली. त्यानंतर राजीनामा मंजूर केला. त्यामुळे दादा कुठे जाणार आहेत किंवा काय करणार आहेत, हे मलाही सांगता येणे कठीण आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT