haribhau bagade haribhau bagade
महाराष्ट्र बातम्या

'राज्याने प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजारांचे अनुदान द्यावं'

आमदार हरिभाऊ बागडे यांची मागणी

प्रकाश बनकर

औरंगाबाद: खतांच्या वाढलेल्या किंमतीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी तब्बल १४ हजार ७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना सुलभतेने खत उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीसाठी सरसकट दहा हजार रुपये रोख अनुदान देण्यात यावेत, अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडे (haribhau bagade) यांनी गुरुवारी (ता.२०) पत्रकाद्वारे केली.

आमदार बागडे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये फॉस्फरिक ॲसिड, अमोनियाच्या किंमती वाढल्यामुळे खतांच्या किंमती वाढल्या. याचा फटका देशभरातील शेतकऱ्यांना बसणार हे ओळखून गेल्याच आठवड्यात मोदी सरकारने त्यावर उपाययोजना सुरू केल्या होत्या. हे लक्षात घेऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. पण त्याआधीच अनुदानाचा निर्णय झाल्याने त्यांची श्रेयाची संधी हुकली आहे. त्यामुळे आता या नेत्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पावसाळापूर्व मशागतीसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट अनुदान मिळवून द्यावे व प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत खत वितरण होईल याची जबाबदारी घ्यावी, असेही आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी जमा
गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेअंतर्गत २० हजार ६६७ कोटींचा निधी जमा केला असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला आहे. आता खतांच्या दरवाढीचा बोजा उचलून मोदी सरकारने शेतकऱ्यांवरील भार आणखी हलका केला आहे. आता शेतकऱ्यांना वेळेत, गरजेएवढे खत मिळेल हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेतीविषयक कामांसाठी दहा हजारांचे अनुदान त्वरित वितरित करावे, पीककर्जासाठी बँकांकडून अडवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी असेही निवेदनाव्दारे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT