Harshavardhan Patil of indapur wants the seat of BJP leader to claim ajit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: भाजपच्या नेत्याचा दादांच्या जागेवर दावा, महायुतीत पडणार मिठाचा खडा?

Latest Pune News : या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पाटील काय निर्णय घेतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News: सध्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोन येत आहेत. परंतु दिलेला नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यात परिवर्तन अटळ असून, विधानसभा निवडणुकीसंदर्भातील पुढचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा (ता. इंदापूर) येथे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पाटील काय निर्णय घेतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

वावड्यातील रत्नाई निवासस्थानी आयोजित सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. इंदापूर तालुक्याची विस्कटलेली घडी बसवावी लागणार आहे, असे नमूद करून पाटील यांनी इंदापूर विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले.

पाटील म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेच्या जागेसंदर्भात जे वक्तव्य केले ते महायुतीच्या धर्माचे पालन करणारे नव्हते. त्यांना महायुतीत हा अधिकार कोणी दिला. सगळ्यांशी विचारविनिमय करू तसेच भाजपच्या वरिष्ठांशीही चर्चा करू. मात्र कोणताही निर्णय अंधारात घेणार नाही, स्वाभिमानाने घेतला जाईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT