Ankita Patil 
महाराष्ट्र बातम्या

लग्न ठरलं सुपर स्प्रेडर; नवरीच पॉझिटिव्ह, मंत्र्यांसह राज्यपालही होते उपस्थित

सकाळ डिजिटल टीम

हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नात राज्यातील नेते, मंत्री यांच्यासह राज्यपालही उपस्थित होते.

मुंबई - भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील (Ankita Patil) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांचे लग्न मंगळवारी पार पडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.

आता अंकिता पाटील यांनी ट्विटरवर आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं.

हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिताचे लग्न निहार ठाकरे याच्यासोबत झाले आहे. निहार हा बिंधुमाधव ठाकरे यांचा मुलगा आहे. या लग्नाला मंत्री,राज्यपाल अनेकांनी उपस्थिती लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: वीज दरवाढीचा उद्योगांना ‘शॉक’; विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आक्रमक ; राज्यात वीज दर प्रति युनिट ११ रुपयांच्या पार

Panchang 29 Marach 2026 : एकादशी विशेष! शुभ वेळा, राहू काळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 29 मार्च 2026

Sunday Special Breakfast: रविवारी बनवा झटपट, चविष्ट आणि पोटभरीचं चीज ऑमलेट सँडविच; घरच्यांना आवडेल असा परफेक्ट वीकेंड ब्रेकफास्ट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मार्च 2026

SCROLL FOR NEXT