harshwardhan 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबद : कन्नड अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याविराेधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता पथक प्रमुखच्या तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचार सभेत आक्षेपार्ह टीका केली. याबद्दल शिवसैनिकांमध्ये आधीच राग होता. दरम्यान, 16 ऑक्टोबरला हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. काही अज्ञातांकडून त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. समर्थनगर भागातील घरावर रात्री 1 च्या सुमारास हल्ला झाला. तर हा चार अज्ञात  व्यक्तींनी हल्ला केला आहे. शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान चार अज्ञात रात्रीच्या वेळी घराबाहेर आले आणि त्यांनी घरावर आणि गाड्यांवर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या गाड्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, हल्ला झाला तेव्हा हर्षवर्धन जाधव हे घरी नसून प्रचारासाठी कन्नडला होते. त्यामुळे हर्षवर्धन जाधव हे घरात नसताना कोणी हल्ला केला याबद्दल आता पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT