Harshvardhan Patil Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

हर्षवर्धन पाटलांना कोरोनाची लागण; मंगळवारी मुलीच्या लग्नात दिग्गजांची उपस्थिती

लग्न सोहळ्याला उपस्थित सुप्रिया सुळेंनाही कोरोनाची लागण.

सुधीर काकडे

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोरक आलं आहे. कालच त्यांच्या मुलीचा विवाह पार पडला. या लग्न सोहळ्यात अनेक बडे नेते देखील उपस्थित होते. कोरोना विषाणुच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर राज्यात सध्या निर्बंध लावले असले तरी, अनेक नेत्यांनी आपल्या मुलांच्या विवाह सोहळ्याच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून आलं आहे. (Harshvardhan Patil Covid19 Positive)

हर्षवर्धन पाटील यांची कन्या तथा बावडा लाखेवाडी ( ता. इंदापूर ) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांचा मुंबई येथील हॉटेल ताज मध्ये निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी दि.२८ डिसेंबर रोजी विवाह झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

Harshvardhan Patil

या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. पैकी विवाह सोहळ्यास उपस्थित खासदार सुप्रिया सुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दि. २९ डिसेंबर रोजी कोरोना बाधित असल्याचे आढळले तर हर्षवर्धन पाटील यांनी सुरक्षिततेच्या कारणावरून कोरोना तपासणी करून घेतली असता ते कोरोना बाधित असल्याचे दि. ३० डिसेंबर रोजी चाचणी अंती स्पष्ट झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT