Amit Shah: sakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah: साखर उद्योगासंदर्भात हर्षवर्धन पाटीलांनी अमित शहांशी केली महत्वाची चर्चा, वाचा भेटीची इनसाईड स्टोरी

Suger Industries| अमित शाह यांचे देशाच्या सहकार मंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या

संतोष आटोळे

Harshvardhan Patill: देशातील साखर उद्योगापुढे आर्थिक अडचणी वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल रु. 4200 करावा,अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे कडे केली.

पाटील यांनी नवी दिल्ली येथे सोमवार(ता. 24) रोजी भेट घेतली.यावेळी साखर उद्योगासंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसेच अमित शाह यांचे देशाच्या सहकार मंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या.

या भेटीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी उसाच्या देय एफ.आर.पी. मध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असून, सन 2019 पासून साखरेच्या किमान विक्री दरामध्ये (एम.एस.पी.) वाढ झालेली नाही. परिणामी, देशातील साखर उद्योगापुढे आर्थिक अडचणी वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल रु. 4200 करावा, अशी विनंती अमित शाह यांचेकडे केली.

या संदर्भातील साखर उत्पादन खर्चाच्या वस्तुनिष्ठ आकडेवाडीसह प्रस्तावाची हर्षवर्धन पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. तसेच देशातील साखर उद्योगाच्या सद्य:स्थितीची, आगामी गळीत हंगामातील संभाव्य साखर उत्पादन, इथेनॉल उत्पादन याची माहितीही अमित शाह यांना हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

-

यावेळी केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या साखरेच्या एमएसपी वाढीच्या प्रस्तावावरती सकारात्मक निर्णय घेईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

-

1) नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक महासंघाच्या कार्यालयामध्ये सोमवारी (ता. 24) रोजी संपन्न झाली. यावेळी देशातील झालेले साखर उत्पादन व इथेनॉल निर्मितीची सद्यस्थिती व आगामी ऊस गळीत हंगामा तसेच साखरेची एम.एस.पी. वाढ आदी विषयां संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT