हसन मुश्रीफ ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif: काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजीनामा देण्याच्या तयारीत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनीही राजीनामा देण्याची भाषा केली आहे.

किरीट सोमय्या यांनी पुन्हा माझ्यावर खोटे, बेताल व समाजात गैरसमज निर्माण करणारे आरोप केले आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. या आरोपांमधील एक जरी सिद्ध झाला, तर मी आमदार पदाचा राजीनामा देईन. असं हसन मुश्रीफ म्हणाले.

माझी बदनामी करण्यासाठीच हे षड्‌यंत्र आहे. काही दिवसांत याच्या मागील बोलवते धनी असणाऱ्यांना आम्ही उघड करू, असा इशारा असा इशाराही मुश्रीफांनी यावेळी दिला.

काय म्हणाले मुश्रीफ?

शेतकऱ्यांच्या शेअर्सच्या पैशावर आम्ही तारणावर कर्ज घेतले. शेतकऱ्यांच्या पैशावर नातेवाइकांना कर्ज दिले, यासह अनेक आरोप त्यांनी केले आहेत. ते सर्व खोटे आहेत. कारखान्याच्या शेअर्ससाठी आम्ही आवाहन केल्यानंतर कमी दिवसांत इतके पैसे जमू शकतात, हे आगळं आणि वेगळं उदाहरण आहे.

आम्ही या शेअर्सपोटी शेतकऱ्यांना दर महिन्याला पाच किलो साखर, खते, बी - बियाणे सवलतीच्या दरात देतो. तसेच त्यांचा ऊस अग्रक्रमाने नेतो. सोमय्यांना माझी लोकप्रियताच बघायची असेल, तर मी आवाहन केल्यानंतर शंभर कोटी रुपये जमू शकतात, इतका विश्वास लोकांचा माझ्यावर आहे.

मी आयुष्यभर लोकांची सेवा केली आहे. गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळे आणि परमेश्वराच्या कृपेने कुठलेही संकटाला पार करू.’’

सोमय्या यांनी आरोप तेव्हापासून मी सांगत होतो की याची माहिती तुम्हाला नाही. कारखानदारीत शेतकऱ्यांचे शेअर्सचे दहा हजार रुपये जमा करून व उर्वरित राष्ट्रीयीकृत पाच बँकांची कर्जे घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आपल्या तीन मुलांनी उभा केला आहे. यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही.

चाळीस हजार शेतकऱ्यांच्या नावावर दहा हजार प्रमाणे जे शेअर्स घेतलेले आहेत, ते २०१० - ११, २०११ - १२ व २०१२ - १३ या तीन वर्षांत कारखान्यासाठी खर्च केले असतील तर ठेव ठेवण्याची गरज काय? शासनाचे कोणतेही अनुदान खासगी साखर कारखान्याला मिळत नाही, याची सुद्धा त्यांना माहिती नसावी, याचे मला आश्चर्य वाटते.’’

ते म्हणाले, ‘‘माझ्यावर व्यक्तिगत कितीही आरोप करू देत; पण जिल्हा बँक जी आम्ही रक्त आटवून उभी केली आहे, राज्यात या बँकेचा गौरव आहे, त्या बँकेला बदनाम करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. शेतकरी यांना माफ करणार नाहीत. मी, एक पैचेही कर्ज घेतलेले नाही. कोणत्या नातेवाइकांनाही दिलेले नाही.

कारखान्याला बेकायदेशीर कर्ज दिलेले नाही. आमदार विनय कोरे, तसेच शिंदे गट व भाजपला मानणारे जे संचालक आहेत यांना मी त्यांच्याकडे पाठवणार आहे. आमचे युनियनचे पदाधिकारीही त्यांना भेटणार आहेत. ते, सोमय्या यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT